Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

Bjp | मालवण शहर प्रभाग 9 विकास कामातून नंबर 1 बनविणार!

Bjp | मालवण शहर प्रभाग 9 विकास कामातून नंबर 1 बनविणार!

भाजपा महिला शहराध्यक्ष नगरसेविका उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांचे प्रतिपादन

मालवण : गावाचा, शहराचा, राज्याचा किंवा देशाचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकसंघ नेतृत्व आणि एक विचाराचं शासन. कारण केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही पातळ्यांवर एकाच विचाराचे सरकार असेल, तर निर्णयप्रक्रिया वेगवान होते, निधी सहज उपलब्ध होतो आणि कोणत्याही योजनेला राजकीय अडथळे निर्माण होत नाहीत. असे भाजप महिला पदाधिकारी आणि नगरपालिका उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर म्हणाल्या .

उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळतं असून अन्वेषा आचरेकर या आमच्या हक्काच्या नगरसेविका म्हणून विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

केंद्रात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातील भाजपाचे स्थिर, निर्णायक आणि एकहाती सरकार असताना
देशाचा कायापालट घडून आला. स्थिर आणि मजबूत नेतृत्वामुळे कोणतीही तांत्रिक किंवा राजकीय अडचण न येता विकासाचं चक्र गतिमान पद्धतीने फिरू लागलं. पायाभूत सुविधांचे विक्रम, डिजिटल क्रांती, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन अशा असंख्य योजना सहज राबवता आल्या. विकसित भारताचं स्वप्न साकार होतंय. असेही सौ. आचरेकर म्हणाल्या.

प्रभागाला शहरात नंबर एक बनविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे साहेब भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून मालवण शहराचा गतिमान विकास होईल. शहराच्या विकासाबरोबरच माझ्या प्रभागाच्या विकासला मला प्राधान्य द्यावयाचे आहे. माझ्या प्रभागाला मालवण शहरात नंबर एक बनविण्यासाठी
माझे नेहमीच प्रयत्न राहणार असल्याचे सौ. अन्वेषा अजित आचरेकर म्हणाल्या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

rapan bottom