रेकोबा पतसंस्थाचे चेरमन मनोज लुडबे यांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेत केले स्वागत
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण खरेदी -विक्री संघाचे माजी संचालक, रेकोबा पतसंस्थाचे चेरमन मनोज लुडबे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मनोज लुडबे यांचे शिवसेनेत स्वागत केले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दिपक पाटकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपतालुका प्रमुख विजय चव्हाण, मंदार लुडबे, अंकित नेरुरकर, शेखर गाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

