मुलूखमैदान तोफ नगरपालिका गाजविणार | प्रभाग चार मधून विजयाचा व्यक्त केला जातोय ठाम विश्वास
मालवण : नगर परिषद प्रभाग ४ मधील उमेदवार शिवसेनेच्या सौ. पूनम नागेश चव्हाण उच्च शिक्षित आहेत. त्यांना त्यांच्या मातोश्री माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. सरोज परब यांचा मोठा राजकीय वारसा लाभला आहे. सौ. पूनम चव्हाण यांच्यात अंगीभूत राजकीय नेतृत्व गुण असल्यामुळे नगरपालिकेत त्यांच्यासारख्या महिला नेतृत्वाची गरज आहे. यामुळे मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणण्याची गरज प्रभागच्या विकासासाठी असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त केले जात आहे.
पूनम चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार
उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेतला असता अनेक मतदारांनी सौ पूनम चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे सांगितले.
शिवसेनेचे दिग्गज पूनम चव्हाण यांच्या प्रचारात
प्रचारा दरम्यान सौ. पूनम चव्हाण यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शहरातील दिग्ग्ज पदाधिकारी त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मालवण नगरपरिषदे मध्ये नगराध्यक्षसह सर्वच्या सर्व वीस नगरसेवक निवडून आणण्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख दत्ता सामंत निवडणुकीची रणनीती राबवीत आहेत. मालवण शहराला कोणत्याही प्रकारच्या विकास निधीची कमतरता पडता नये यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्नशील आहेत. मालवण शहराला जागतिक दर्जाचे बनविण्या निलेश राणे यांनी चंग बांधला आहे.
नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली जात आहे. तर नगरसेवक पदाच्या उमेदवार पूनम चव्हाण यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

