यंत्रणेने चौकशी करावी ; भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मांडली भुमिका
मालवण : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, मालवण नगरपालिका निवडणुकीच्या प्राचाराच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष या नात्याने मालवण कार्यालयात उपस्थित होतो. आणि त्यावेळी आमदार नीलेश राणे यांनी एक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि त्या फेसबुक लाईव्हमध्ये आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी भेट देत असल्याचे दिसून आले. केनवडेकर यांच्या घरामध्ये काही पैसे सापडले तर त्या सर्व पैशांचा संबंध त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जोडला होता, खरतर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्यांच्या घरी जाणे योग्य नाही. यासाठी अनेक यंत्रणा आहेत तर त्या यंत्रणांच्या माध्यमातून ते केले पाहिजे होते, असे सावंत म्हणाले.

विजय केनवडेकर आमचे जेष्ठ पदाधिकारी व संघाचे स्वयंसेवक आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये ते कार्यरत आहेत. या व्यक्तीकडून पैशांसंदर्भात असा काही विषय होण्याचा संबंध नाही. तरी सुद्धा त्यांना यंत्रणेने विचारल्यानंतर त्यांना त्याची माहिती दिली गेली. त्यामुळे त्यांनी सांगितले की, माझ्या व्यवसायातील हे माझे पैसे होते. पोलिस असतील, निवडणूक आयोग असेल त्यांना याची माहिती केनवडेकर देतील एका गोष्टीचे फार वाईट वाटते की, मालवणमध्ये झालेली ही निवडणूक सुरु झाल्यापासून महायुतीचेच घटक असलेले आणि आता आमच्या विरोधात असलेले आमदार नीलेश राणे आणि सोबतचे पदाधिकारी यांनी या निवडणुकीला एका वेगळ्या प्रकारे घेतले गेले आहे, ही बाब मालवण वासियांना अपेक्षित नव्हती, असेही श्री. सावंत म्हणाले.
आमच्या उमेदवार असतील त्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न चार दिवस चालला आणि काल या गोष्टीचा पर्दाफाश झाला. एक अध्याय बदनामीचा संपला आणि आता दुसरा अध्याय सुरु झाला आहे. खरतर या सर्व पैशांसंदर्भात त्यांचा काही संबंध असेल कारण ते व्यावसायिक आहेत त्यांच एक चपलाचे मार्ट आहे, त्यांच कंस्ट्रक्शन आहे. याबाबत यंत्रणा त्याची चौकशी करु शकते. निवडणुकीच वातावरण पाहून विरोधी पक्षाच्या पायाखालील माती सरकली आहे. असले छोटे मोठे विषय करुन बदनामी करण्याचे काम सुरु केले आहे. आज आमदार त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांची एक वयोवृद्ध आई होती, त्यांची बायको ही सर्व असताना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेली. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम त्यांनी करु नये. कार्यकर्त्यांमध्ये जोश असल्याने आमचे २० नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या निवडणुकीत निवडून येतील. जनता विकासाला प्रधान्य देऊन निवडून येतील. असेही ते म्हणाले

