मालवण नगरपरिषद प्रभाग चार मध्ये पुनम चव्हाण यांच्या विजयचा व्यक्त केला जातोय ठाम विश्वास
संदीप बोडवे/मालवण : मालवण नगरपरिषद - २०२५ ची निवडणूक मालवण शहरवासीयांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडविणारी ठरणार आहे. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून मालवण वासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नागरिकांना झपाट्याने विकास हवा आहे. वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न, आरोग्य आणि जीवनमान सुधारविण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे. समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू लहापणासूनच मिळालेले आल्यामुळे मी मालवण नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहे. माझ्या प्रभागात गतिमान विकास कार्या सोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे मत सौ. पूनम चव्हाण यांची स्काय न्यूज नेटवर्क टुडे शी बोलताना व्यक्त केले.
शहराचा महत्त्वपूर्ण प्रभाग
वाघ पिंपळ, एस टी स्टैंड, समाज मंदिर असला प्रभाग क्रमांक ४ मधून सौ पूनम चव्हाण नगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक लढवित आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये राज्य मार्ग 182, आईस फॅक्टरी ते भरड नाका पर्यंत. आडवण स्मशानभूमी, मुस्लीम कब्रस्थान रस्ता, वायरी मुख्यरस्ता, परुळेकर घर, भोसले पाणंद, कामाक्षी नर्सिंग होम, किर पाणंदपर्यंत. मकरोबा मंदिर पसंत शाळा गवंडीवाडा श्रीराममंदिर तळाशिलकर घर मेस्त्री घरापासून कोळंबकर रस्ता. असा परिसर समाविष्ट आहे.
आमदार निलेश राणे व्हिजन असलेले नेतृत्व
शिवसेनेचे फायर ब्रँड युवा नेते आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे शहर विकासाचे व्हिजन आलेले नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वावर मालवण शहराचा विकास कोणीही थांबवू शकणार नाही. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न आज मार्गी लागले आहेत. सुसज्ज बस स्थानक हे याचे उदाहरण आहे.
बहुजन समाजाच्या उन्नती साठी सदैव प्रयत्न
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील बहुजन समाजाच्या उन्नती साठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मालवण पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यास कार्यसम्राट आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वात विकास झपाट्याने होणार आल्याचा विश्वास सौ पूनम चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

