मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या उबाठा गटाच्या उपसरपंच समृद्धी आसोलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
मालवण नगर परिषद निवडणूक निमित्ताने मालवण शहरात भाजपची जाहीर प्रचार सभा मंगळवारी रात्री संपन्न झाली. या प्रचार सभेच्या निमित्ताने समृद्धी आसोलकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी मालवण शहरातील काही प्रभागातील नागरिकांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, नगरपरिषद निवडणूक भाजपा नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत, भाजपाचे नगरसेवक उमेदवार तसेच अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

