नगराध्यक्ष उमेदवार सौ. ममता वराडकर, प्रभाग आठ नगरसेवक उमेदवार शर्वरी पाटकर, राजन परुळेकर यांच्या विजयाचा व्यक्त करण्यात आला विश्वास
मालवण : मालवण नगरपरिषद प्रभाग आठ येथील शिवसेना प्रचार कार्यालयाचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तसेच नगराध्यक्ष उमेदवार सौ. ममता वराडकर, प्रभाग आठ नगरसेवक उमेदवार शर्वरी पाटकर, राजन परुळेकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


