शिवसेना प्रचार कार्यालयाचे प्रभाग ४ मध्ये उदघाटन
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण : शिवसेनेचा झंझावाती प्रचार मालवण शहरात सर्वत्र सुरु असून नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह सर्व शिवसेना उमेदवारांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळतं आहे. मालवण नगरपरिषद प्रभाग ४ मध्ये शिवसेनेच्या उच्च शिक्षित उमेदवार सौ. पूनम नागेश चव्हाण यांनाही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने पूनम चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाट्न शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते करण्यात आले.
पूनम चव्हाण म्हणाल्या आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून विकासकामांच्या माध्यमातून आदर्श प्रभाग बनवणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा घेऊन येत्या काळात नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल असा ठाम विश्वास व्यक्त करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार निलेश राणे मोठया प्रमाणात विकासनिधी आणतील, अशी ग्वाही दिली.

यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, उमेश नेरूरकर, जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, अंकित नेरूरकर, नागेश चव्हाण, निकित वराडकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभागातील साईराज चव्हाण, सागर गावकर, हर्षदा कारेकर, देवदास गावकर आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
▪️अमित खोत, मालवण

