Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पर्यटन आणि मासेमारीतून तरुणांना अधिक रोजगार मिळण्यासाठी प्रयत्नाशील

पर्यटन आणि मासेमारीतून तरुणांना अधिक रोजगार मिळण्यासाठी प्रयत्नाशील

भाजपा म्हणजे विकासाची गॅरंटी

नगरपालिका उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांचा विश्वास

कष्टकऱ्यांचे भवितव्य ठरविणारी निवडणूक

संदीप बोडवे | स्काय न्यूज टुडे मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सर्वसामान्य कष्टकरी वर्गा बरोबरच मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांच्या काही समस्या आहेत. प्रभागात प्रचारादरम्यान फिरत असताना, नागरिकांशी संवाद साधत असताना भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत हे लक्षात येते. मालवण नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता यावी, भाजपचा नगराध्यक्ष निवडून यावा असे मतदारांना वाटत आहे. भाजपा म्हणजे विकासाची गॅरंटी असल्याचे मत प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरपालिका उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि महिला, युवती, तरुणांमध्ये उत्साह

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रभाग प्रभारी दाजी सावजी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत यांच्या सह अन्वेशा आचरेकर, सन्मेष परब आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घराघरांमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाची विचारधारा पोहोचवीत आहेत. प्रचार फेरी दरम्यान ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद मिळत आहे. महिला, युवती, तरुणांमध्ये उत्साह असून ते आमच्यासोबत प्रचारात सहभागी असल्याचे सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी सांगितले.

प्रत्येक हाताला काम, हेच भाजपाचे उद्दिष्ट

माझ्या प्रभागात कष्टकरी नागरिक आणि महिलांची मोठी संख्या आहे. शेती, बागायती, मासेमारी, पर्यटन, खानावळ, हॉटेल यामाध्यमातून येथील नागरिक आणि महिला कार्यरत आहेत. मजूर, महिला, निराधार, जेष्ठ, दिव्यांग, अशा समाजातील सर्व स्तरातील वर्गाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, कोणतीही व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक कष्टकरी नागरिकाला सन्मानाची वागणूक मिळावी, त्याच जीवनमान उंचावणे हे भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट असल्याचेही सौ. अन्वेषा अजित आचरेकर म्हणाल्या.

भाजपाचे शासनच नागरिकांचे जीवनमान उंचावेल

केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. इथले पालक मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नितेशजी राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे असे मत्स्य आणि बंदर विकास खाते आहे. हे मंत्रालय मालवण मधील बहुतांश जनतेच्या रोजच्या प्रश्नांशी निगडित आहे. ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणे, मालवणचे सुपुत्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे मालवण वर विशेष प्रेम आहे. या दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रभागातील जनता भाजपा उमेदवारांनाच मतदान करतील असाही विश्वास सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी व्यक्त केला

rapan bottom