उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून आमदार निलेश राणे यांचे खास कौतुक
सिंधुदुर्गात निलेश राणेंच्या प्रवेशा नंतर शिवसेना जोमात
स्काय न्यूज टुडे : खासदार नारायण राणे यांच्या प्रमाणे सिंधुदुर्ग चालविण्याची ताकद फक्त नीलेश राणे यांच्यामध्येच आहे. आमदार नीलेश राणे यांची भाषणे मी नेहमी एकत असतो. ते आता डायरेक्ट हिट करत नाहीत. ते आवश्यक वेळी षटकार मारत आहेत. त्यांच्यात राजकीय परिपक्वता आहे. अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले आहे.
मालवण येथील नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारसभेला ते संबोधित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, उमेश नेरूरकर, महेश कांदळगावकर, संजय पडते, रत्नागिरी सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख राजेश मोरे, काका कुडाळकर, बबन शिंदे, आनंद शिरवलकर, मधुरा तुळसकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, मला आता त्यांचा हेवा वाटत आहे. त्यांचे कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारातील भाषण हे जबरदस्त होते. त्यामध्ये त्यांनी खासदार नारायण राणे यांना त्रास होईल असे एकही विधान केले नाही. यामुळे त्यांनी घेतलेली भुमीका योग्यच आहे.
सिंधुदुर्गात नीलेश राणेंच्या प्रवेश झाल्यानंतर ज्या जोमाने शिवसेना वाढली आहे. संपूर्ण जिल्हा शिवसेनामय झाला आहे, त्याचे सर्व श्रेय नीलेश राणेंनाच जाते. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास लक्ष श्री. राणे यांच्याकडे आहे. यामुळे आमदारांची ताकद वाढविण्यासाठी शहरवासियांनी पालिकेवर एकहाती सत्ता शिवसेनेची आणली पाहिजे. पालिकेच्या सर्वांगिण विकासाचा शब्द मी देत आहे, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

