विकासाचा ध्यास घेऊन आमदार निलेश राणे यांची वाटचाल
निलेश राणे यांच्या कर्तृत्वाचा धसका अनेकांनी घेतला
मालवण नगरपरिषदेत शिवसेनेचा विजय निश्चित
नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह सर्व शिवसेना नगरसेवक विजयी होणार

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणच्या विकासाचा ध्यास घेऊन आमदार निलेश राणे यांची वाटचाल सुरु आहे. निलेश राणे यांच्या कर्तृत्वाचा धसका अनेकांनी घेतला असून त्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र धनुष्यबाण घेऊन सर्वांच्या विरोधात लढणाऱ्या निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेत शिवसेनेचा विजय निश्चित आहे. यापुढे मालवण शहर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात अग्रेसर राहील. असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
कोणीही कितीही प्रयत्न केला तरी मालवणातील मतदार आमदार नीलेश राणेंच्या अर्थात शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील. शिंदे साहेब, राणे साहेब यांना आनंद होईल अश्या प्रकारे आम्ही काम आम्ही करू. राणे साहेबांच्या स्वप्नतील मालवण शहर निलेश राणे यांच्या नेतृत्वात निर्माण करू. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विशेष प्रेम आमदार निलेश राणे यांच्यावर असल्याने निधी कमी पडणार नाही. असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना मधून 500 युवक युवतीना मालवण किनारपट्टीवर पुढील काळात रोजगार देणार. असे मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांना आश्वस्त केले.
मालवण येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, उमेश नेरूरकर, संजय पडते, काका कुडाळकर, बबन शिंदे, आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, संग्राम साळसकर यांसह शिवसेना नगरसेवक उमेदवार वसंत गांवकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, दिपक पाटकर, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पुनम चव्हण, विलास मुणगेकर, नंदिता वरवडेकर, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गांवकर, राजन परुळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोरजे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर उपस्थित होते. याप्रसंगी उद्योगमंत्री सामंत यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील अनेक युवा कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश केला.
निवडणुका येतील जातील. पण एकमेकांचे संबंध टिकले पाहिजे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. यामुळे सिंधुदुर्गात युती झाली नाही याचे सर्वात जास्त दुखः खासदार नारायण राणे यांना झालेले आहे, युती व्हावी ही इच्छा होती. यामुळे आम्ही त्यांना त्रास होईल अशी भूमीका कधी घेतलेली नाही. भाजपकडून उमेदवारी दाखल करण्यात आल्यानंतर आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे. आमचं दुदैव आहे की सिंधुदुर्गात युती न होता आम्ही लढत आहोत, अशी खंत मंत्री सामंत यांनी व्यक्त केली. मालवणातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणमध्ये येतील असेही यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक करताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आपल्या खास शैलीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टिका करत युती तुटली त्याला तेच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.
आमदार निलेश राणे राज्यात 'टॉप टेन'
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ मतदार संघ आदर्श बनेल. पहिल्या वर्षात त्यांनी शेकडो कोटी विकासनिधी आणून विकासाची धमक दाखवून दिली. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्द्यावर मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना लढत आहे. जनतेच्या पाठिंब्यावर नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह सर्व नगरसेवक विजयी होतील. विजयाची भेट शिंदे साहेब, राणे साहेब यांना देणार. असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
भाजप नगराध्यक्ष उमेदवाराकडून दोन जातींची फसवणूक
एखादी व्यक्ती मराठा समाजाची असताना ती ओबीसीचे जातप्रमाणपत्र घेते यामुळे ती व्यक्ती मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक करत आहे. याची नोंद मालवणवासियांनी घेतली पाहिजे. दोन जातीचा अपमान केल्याची संपूर्ण महाराष्ट्रात पहिली घटना घडलेली आहे, अशीही टिका मंत्री सामंत यांनी केली.

आमदार षटकार मारतातच
आमदार नीलेश राणे यांची भाषणे मी नेहमी एकत असतो. मला आता त्यांचा हेवा वाटत आहे. त्यांचे कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारातील भाषण हे जबरदस्त झाले होते. त्यामध्ये त्यांनी खासदार नारायण राणे यांना त्रास होईल असे एकही विधान केले नाही. त्यांच्यातील राजकीय परिपक्वता खूप आहे. ते आता डायरेक्ट हिट करत नाहीत. ते खेळवून खेळवून नंतरच षटकार मारत आहेत. यामुळे त्यांनी घेतलेली भुमीका योग्यच आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.
नीलेश राणेंचा धसका काहींनी घेतला
भाजप बरोबर नैसर्गिक युती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा होता. मात्र नीलेश राणेंचा धसका काही लोकांनी घेतला आहे, हे निर्वावाद सत्य आहे. खासदार नारायण राणें यांच्या सारखे नेतृत्व नीलेश राणे यांच्यामध्येच आहे. यामुळे काही लोकांनी धसका घेतलेला आहे. नीलेश राणेंचा प्रवेश झाल्यानंतर जोमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना वाढली आहे. संपूर्ण जिल्हा शिवसेनामय झाला आहे, त्याचे सर्व श्रेय नीलेश राणेंनाच जाते. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास लक्ष श्री. राणे यांच्याकडे आहे. यामुळे आमदारांची ताकद वाढविण्यासाठी शहरवासियांनी नगरपालिकेवर एकहाती सत्ता शिवसेनेची आणली पाहिजे. नगरपालिकेच्या सर्वांगिण विकासाचा शब्द मी देत आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.

वणवा इथेच विझला पाहिजे
युती तुटल्याबाबत कोण जबाबदार हे आम्ही यापूर्वी मांडले आहे. आणखी काही गोष्टी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मांडणार आहे. मात्र शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी ही नैसर्गीक असलेली युती कायम रहावी हाच माझा प्रामाणिक हेतू आहे. युती तोडण्याचा भडकलेला वणवा याचठिकाणी विझावा म्हणून मी सगळं अंगावर घेत आहे. आमचे सर्वांचे विचार एक आहेत. मात्र जाणीवपूर्वक कोणी काही करत आहेत, त्याला वेळीच थांबविण्यासाठी आपण लढत आहे. मालवणचे मतदार विचारपूर्वक मतदान करतील. याठिकाणी शहरविकासाचे व्हीजन घेऊन आम्ही चाललो आहे. जनतेचा सर्वांगिण विकास करण्याचे स्वप्न आमच्यामध्ये असून ते पूर्ण करण्याची धमकही आहे, असेही निलेश राणे यावेळी म्हणाले.
मला रोखण्याचा प्रयत्न कोणी करू नका
आता पोलिसांना आमदार नीलेश राणेंच्या मिनीटा मिनीटाच्या दौऱ्याची माहिती हवी आहे. मला रोखण्याचा प्रयत्न कोणी करू नका. मला ज्याठिकाणी पोहचायचे आहे त्याठिकाणी मी पोहचणारच आहे. मी काहीही खोटं करत नाही आणि खोटे सहनही करणार नाही. राज्यात ३५० पेक्षा जास्त किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जीगर होता. मुगल आले निजाम आले तरीही महाराज कधी डगमगले नाही. आम्ही महाराज्यांच्या विचारांवर चालतो. त्यामुळे कोणी नको त्या विषयात जाऊ नका. राज्यात सर्वत्र निवडणुका असताना प्रदेशअध्यक्ष पुन्हा पुन्हा मालवणात येत आहेत. एवढे करूनही आम्ही जिंकलो तर कोणाकोणाला लपायलाही जागा मिळणार नाही. असा टोला आमदार निलेश राणे यांनी लगावला.
दर्जेदार आणि पारदर्शक कारभार हेच लक्ष : आमदार निलेश राणे
मालवण शहारात शिवसेनेचा भगवा फडकवून दर्जेदार आणि पारदर्शक कारभार करणार. मोठा निधी आणणार. शहर विकस प्लॅन जनतेसमोर ठेवणार. खोट्या घोषणा करणार नाही. असे सांगून आमदार म्हणाले कुडाळ शहर व एमआयडीसी येथे ही मोठा विकासनिधी मंत्री उदय सामंत यांनी दिला. त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे आमदार निलेश राणे म्हणाले.
खोटे जातप्रमाणपत्र | आम्ही कोर्टात जाणार : आ. नीलेश राणेंचा आरोप
मालवण नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उभ्या असलेल्या शिल्पा खोत यांचे जातप्रमाणपत्र खोटे आहे. त्या महिनाभरापूर्वी मराठा होत्या आता ओबीसी झाल्या. कालेलीचे परब वरवडे मध्ये कधी गेले. कुणबी दाखवताना ज्यांचे नाव वंशावळ मध्ये जोडले त्याचा शोध लागत नाही. मनोहर विठ्ठल परब की मनोहर विठू परब हे सर्व जनतेसमोर आणणार. आम्हाला या गोष्टींमध्ये जायचे नव्हते, मात्र आमच्या उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेत तब्बल अडीच तास सुनावणी घेण्यात आली होती. आता आम्ही गप्प बसणार नाही. उमेदवाराच्या जातप्रमाणपत्राची सविस्तर माहिती घेतली आहे, आणि जनतेसमोर ती मांडणार आहे, याबाबत आम्ही कोर्टात जाणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

