प्रचारा दरम्यान जनतेचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
विजयाचा व्यक्त केला जातोय विश्वास
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपाच्या सौ. अमृता अनिकेत फाटक या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना प्रचारा दरम्यान जनतेतून मिळतं असलेला पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा तसेच भाजपच्या प्रभागातील नगरसेवक उमेदवार ललित चव्हाण व नगराध्यक्षा उमेदवार सौं. शिल्पा यतीन खोत यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सौं. अमृता अनिकेत फाटक या उच्च शिक्षित असून सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान आहे. त्यांचे पती अनिकेत यांचे आजोबा यशवंत लक्ष्मण फाटक हे नगरसेवक होते. आता तोच वारसा अमृता फाटक या पुढे नेतील. फाटक कुटुंबाचे सामाजिक योगदान अनेक उपक्रमातून नेहमीच राहिले आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबा त्यांना निश्चितच मिळेल.
एकूणच अमृता फाटक यांना प्रचारादरम्यान प्रभागात सर्वच ठिकाणी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाचा विश्वास ठामपणे व्यक्त केला जात आहे.

