Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

BJP | मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहराचा होणार गतिमान विकास!

BJP | मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहराचा होणार गतिमान विकास!

भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांचा विश्वास

पुढील पिढीचे भविष्य ठरविणारी ठरणार निवडणूक

प्रचारादरम्यान भाजपा उमेदवारांना जनतेचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

संदीप बोडवे: स्काय न्यूज टुडे : केंद्रात आणि राज्यात आपली भाजपाची सत्ता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नितेशजी राणे हे कॅबिनेट मंत्री पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे असे मत्स्य आणि बंदर विकास खाते आहे. हे मंत्रालय मालवण मधील बहुतांश जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडित आहे. येथील जनतेचा कोणताही प्रश्न असो तो मी सोडविणारच अशा शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. यामुळे मालवण नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास मालवणचा विकास गतिमान होणार. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी व्यक्त केला.

सौ. शिल्पा यतीन खोत यांचा शहरात उत्स्फूर्त प्रचार सुरु आहे. जनतेचा पाठिंबा त्यांना मिळतं आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या. यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार चारुशीला आचरेकर, सन्मेष परब, प्रभाग निरीक्षक दाजी सावजी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मत्स्य विक्रेत्या महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

सौ. शिल्पा खोत म्हणाल्या, मालवण मधील अर्ध्याहून अधिक मतदार किनारपट्टी, मासेमारी, आणि पर्यटन व्यवसायाशी निगडित आहेत. अनेक महिला मत्स्य विक्री, आणि त्या संबंधी  व्यवसाय करत आहेत. मासे विक्री, खारविणे, माशांची साठवणूक करणे, मासळी सुकविणे आदी कामे या महिला करत आहेत. प्रभागात फिरून कष्टकरी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या असता मत्स्य विकास खात्याच्या माध्यमातून या भागात अनेक विकास कामे करता येणे शक्य आहे. मत्स्य विक्रेत्या महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे सौ. खोत यावेळी म्हणाल्या.

बंदर विकास खात्याचा मिळणार लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याजवळील मत्स्य आणि बंदर विकास खात्याच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदे मार्फत अनेक विकासकामे राबविता येणार आहेत. मालवण बंदर जेटीचे सुशोभीकरण, राजकोट किल्ल्यावर मरीना प्रकल्प, मालवण शहराच्या किनारपट्टीवर रिंग रोड, सिंधुदुर्ग किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास, सुसज्ज मासळी मार्केट, किनारपट्टीवर सांडपाणी व्यवस्थापन, तरंगती पर्यटनजेटी, किनाऱ्यावर पार्किंग आणि स्वच्छतृहाची व्यवस्था आदी कामे आमच्या डोळ्यासमोर आहेत. या कामांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून देत आपल्याला सर्वसामान्यांचे जीवनमान  उंचवायचे असल्याचेही सौ. खोत यांनी स्पष्ट केले.

जिथे भाजपा तिथे विकास

सर्वत्र भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिमाखात फडकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आता भारत देशापुरते मर्यादित न राहता ते विश्व गुरु असल्याचे जगाने मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात भारत जागतिक महासत्ता बनला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताच्या ताकदीचा अनुभव जगाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालवण मध्ये नौदल दिन साजरा करून समस्त मालवणवायांची मान गर्वाने उंच केल्याचे सर्वांनी पाहिले आहे.

पुढील पिढीचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही राज्य झपाट्याने विकसित होत आहे. आज मालवण मध्ये अनेक पर्यटन प्रकल्प प्रस्तावित आहेत. तरुणांमध्ये कौशल्य विकास, आणि त्यातून स्वयंरोजगार हे आमच्या सरकारचे सूत्र आहे. देश आणि राज्याच्या विकास प्रक्रियेत मालवण शहर कुठेही मागे राहत नये यासाठी मालवणच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठाम पणे उभे राहिले पाहिजे. ही निवडणूक येथील नागरिकांच्या पुढील पिढीचे भविष्य ठरविणारी निवडणूक ठरणार असल्याची सौ खोत म्हणाल्या.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

rapan bottom