जनतेतून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : भरड गवंडीवाडा प्रभाग आठ हा कुटुंब आहे असे मानून जनतेशी जोडलेले संतोष शिरगावकर, मरिना फर्नांडिस हे उमेदवार भाजपने या प्रभागात उतरविले आहेत. प्रामुख्याने बाजारपेठ आणि दाटवस्तीचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रभागातून भाजपच्या उमेदवारांना मिळत असलेला पाठिंबा यामुळे मतदारांनी आपला निर्णय ठाम केल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
मतदारांकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक फिक्स
या प्रभागातुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत, नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष शिरगावकर व सौ. मरिना फर्नांडिस यांनी काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये मतदारांनी दाखविलेला उत्साह. दिलेला प्रतिसाद यामुळे मतदारांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक फिक्स केल्याचे चित्र आहे. यामुळे या प्रभागातून भाजपचे लोकप्रतिनिधी पालिकेत जाण्यासाठी सज्ज झाल्याचा विश्वास व्यक्त करतं आहेत.

शांत संयमी अश्या संतोष शिरगावकर मानणारा मोठा वर्ग
दोन्ही उमेदवारांना मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. संतोष शिरगावकर हे कायम प्रचारात आपले योगदान यापूर्वी देत असल्याने त्यांना या प्रभागाची चांगलीच ओळख असून त्यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. तरुणांची भक्कम साथ संतोष यांच्या बाजूने असल्याने प्रचार रॅलीमध्ये मिळत असलेला प्रतिसाद हा त्यांच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा ठरत आहे. शांत संयमी आणि आपले वाटणारे असे हे नेतृत्व आहे. शिरगावकर आणि फर्नांडिस हे दोन्ही युवा चेहरे असल्याने मतदार त्यांच्यासाठी सातत्याने विजयाच्या शुभेच्छा देत आहेत, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले.
प्रभागात ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्व
महिला उमेदवार असलेल्या सौ. मरिना फर्नांडिस या याच प्रभागातील कन्या आणि सूनही आहेत. यामुळे त्यांचे आयुष्य प्रभागातील मतदारांसोबत गेले आहे. ख्रिस्ती समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा असतो. प्रभागात धार्मिक कार्यव मात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या उमेदवारीमुळेअनेक वर्षांनंतर या प्रभागात ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले असल्याने समाजातून त्यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे.
पालकमंत्री यांनी प्रभागात जाऊन जनतेशी साधला संवाद
संतोष शिरगावकर आणि मरिना फर्नांडिस यांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे थेट त्यांच्या प्रभागात पोहचले. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जनतेशी आपुलकीने संवाद साधला. विकास कामांसाठी कतिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या हक्काच्या घरांना संरक्षण
पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले किनारपट्टीवरील मच्छीमारांना त्यांच्या हक्काच्या घरांसाठी संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. किनारपट्टीवर मच्छीमारांचाच अधिकार असून त्यांच्या झोपड्या, घरे कशाप्रकारे संरक्षित करता येतील, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. पारंपरिक मच्छीमारांना त्रासदायक ठरत असलेल्या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात सातत्याने कारवाई होत असल्याचे सांगितले. मच्छीमार, पर्यटन व्यवस्यायिक कुटुंबियांची भाजपला साथ मिळेल, असाही विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रभागातील जनाता हेच आमचे कुटुंब मानून कार्यात राहणार : संतोष शिरगावकर व मरिना फर्नांडिस
भाजपा सरकारकडून यापूर्वीही किनारपट्टीवर मच्छीमारांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असून शासनाच्या विविध योजनांचा फायदा मच्छीमार व त्यांच्या कुटुंबियांना मिळत आहे. याहीपुढे शासनाच्या सर्व योजना प्रभागात राबवून विकसीत प्रभाग निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे उमेदवार संतोष शिरगावकर व मरिना फर्नांडिस यांनी सांगितले.

