आडवली मालडी जि.प विभागात उबाठा गटाला धक्का
मालवण : निरोम, असगणी, हिवाळे ओवळीये येथील कट्टर उबाठा गटातील प्रमुख पदाधिकारी बंडू चव्हाण, संतोष घाडी, खेडेकर यांसह अनेक पदाधिकारी यांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी तालूका प्रमुख विनायक बाईत, तालूका प्रवक्ते निलेश बाईत, जिल्हा चिटणीस सुनील घाडीगांवकर, माजी सभापती सुनिल घाडीगांवकर, तालुका चिटणिस मकरंद राणे, प्रशांत परब, मंगेश यादव, बाळा वेंगुर्लेकर, गुरु घाडीगांवकर, मंगेश बागवे, बबन परब, प्रकाश कासले, अभि साटम, राजू जगताप, बाबु परब, युवा तालूका अध्यक्ष अभी लाड, योगेश परब यांच्या उपस्थितीत आडवली मालडी जीप विभागात शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून शिवसेना पक्षाची वज्रमुठ होत आहे.
गोठणे गावचे माजी उपसरपंच बाबु परब यांच्या उपस्थितीत गोठणे सडेवाडी येथिल कट्टर कार्यकर्त्यांनी ही जाहीर पणे बाबु परब यांच्या साथीने शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे . खारदार नारायण राणे साहेब यांच्या विजयात मोलाचा वाटा गोठणे गावाचा कायम राहीला आहे. मध्यतरीच्या काळात गोठणे ग्रापचे उपसरपंच म्हणून बाळा परब गावचे नेतृत्व करत होते. पण गोठणे सडेवाडी येथे विकास कामांना हवे तसे सहकार्य मिळत नव्हते. कार्यसम्राट आमदार निलेश राणे साहेब यांच्या कामाचा धडाका पाहुन गोठणे गावच्या विकासासाठी शिवसेना आमदार निलेश राणे साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही ही गोष्ट त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना मालवण तालूका प्रवक्ते निलेश बाईतयांच्याशी संपर्क साधून गावातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चर्चा करून शिंदे सेनेत जाण्याचा निर्धार केला.
तालुका प्रमुख विनायक बाईत ज्या पद्धतीने पक्ष संघटना वाढवत आहेत जुण्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेवुन शिवसेनेची पक्षसंघटना वाढवत आहेत. त्यांच्या साथीला प्रवक्ते निलेश बाईत प्रशांत परब मंगेश यादव सुनिल घाडीगांवकर हे दिवस रात्र लोंकामध्ये सामाजिक क्षेत्रात भेट देतात ही संघटना 80% समाजकारण आणि 20 % राजकारण करणारी शिवसेना म्हणुन आम्हांला गर्व आहे. हीच खरी शिवसेना आहे इथे आमचा नक्कीच सन्मान होईल.
आणि गोठणे गावच्या विकास कामासाठी आमदार निलेश राणे, दत्ता सामंत, तालुका प्रमुख विनायक बाईत यांच्या नेतृत्वाखाली मालवण प्रवक्ते निलेश बाईत यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन आम्ही शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा हाती घेतला.
गोठणे गावचे माजी सरपंच हे शांत संयमी आणि मुरब्बी राजकारणी म्हणुन ओळखले जातात. येत्या काही दिवसात गोठणे गावासहीत श्रावण पंसं मध्ये उबाठा गटाचा जाहीर पक्ष प्रवेश होणार असुन आडवली मालडी जि प विभागात शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल असा विश्वास प्रवेश कर्त्यांनी दिला.

