Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक; संशयीतांची सशर्त जामीनावर मुक्तता

चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक; संशयीतांची सशर्त जामीनावर मुक्तता

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले

मालवण : रात्रीच्या वेळेस चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्रासहित फिरताना ताब्यात घेतलेल्या संशयीत शहाजी देवा चव्हाण वय 30 वर्षे राह. सारसा जिल्ह्या लातूर व संजय नवनाथ पवार वय 35 वर्ष राह. येरमाळा ता. कळंब जि. धाराशीव सध्या राह. नेरूर चव्हाटा ता. कुडाळ यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

याकामी मालवण पोलिस गस्त करत असताना दि. 18/11/2025 रोजी संशयीत गुरामवाड येथे रात्रीचे वेळी संशयितरित्या फिरताना दिसल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांचे ताब्यात धारदार शस्त्रास्त्र आढळून आले. शस्त्र बाळगल्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे व वागणुक संशयास्पद वाटल्याने फिर्यादी पोलीसांनी संशयीतांविरूद्ध सूर्यास्त ते सूर्योदयाच्या कालावधीत चोरीच्या उद्देशाने धारदार शस्त्र बाळगून संशयितरित्या फिरत असल्याबद्दल दि. 18/11/2025 रोजी मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मालवण पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम (4), (25) व मुंबई पोलीस अधिनियम कलम 122 व 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मालवण पोलिसांनी प्राथमिक तपासकाम करून संशयितास दि. 19/11/2025 रोजी मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी मे. न्यायालयाने संशयितांची दि. 20/11/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलीसांनी संशयिताना पुन्हा मे. न्यायालयात हजर केले असता मे. न्यायालयाने संशयीतां न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

त्यानंतर संशयीतांतर्फे जामीनअर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयितांची रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.

rapan bottom