Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

ललित चव्हाण आणि अमृता फाटक यांची प्रचारात आघाडी

ललित चव्हाण आणि अमृता फाटक यांची प्रचारात आघाडी

भाजपची फायर ब्रँड युवा ब्रिगेड मैदान गाजविणार…..!

प्रभाग क्रमांक दोन मध्ये ललित चव्हाण आणि अमृता फाटक यांना प्रचारात मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

विजयाचा व्यक्त करण्यात येतोय विश्वास

स्काय न्यूज नेटवर्क मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपा उमेदवार ललित चव्हाण आणि अमृता फाटक यांना प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतं आहे. त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

तौक्ते वादळ आणि कोराना महामारीमध्ये सर्वसामान्य जनता संकटात असताना आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र यांच्या सेवेसाठी सदैव सक्रिय राहून लोकांना सर्वतोपरी मदत कार्य करणारा युवा चेहरा म्हणून ओळख असणारा भाजपचे फायरब्रॅण्ड युवा नेतृत्व ललित हरी चव्हाण यांच्या रुपाने तरुण चेहरा प्रभाग दोनमधून भाजपच्या निशाणीवर निवडणूक रिंगणात उतरलेला आहे. शहरातील सर्वात तरुण उमेदवार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. कॉलेज जीवनामध्येही समाजकार्याची आवड असल्याने आणि घरामध्येच भाजप विचारांचा दांडगा अनुभव असल्याने ललित याने थेट भाजप युवा संघटनेमध्ये काम करत आपली वेगळीच ओळख प्रभागात निर्माण केली आहे.

ललित याच्यासोबत युवा महिला चेहरा म्हणून अमृता अनिकेत फाटक याही भाजपकडून कमळ या निशाणीवर रिंगणात आहे. फाटक कुटुंबीय सुसंस्कृत आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे म्हणून ओळखले जात आहे. सौ. अमृता याही आपल्या कुटुंबियांची ओळख कायम ठेवत समाजकार्यातून लोकसेवक होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांचे पती आंबा उद्योजक अनिकेत फाटक हे नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात. अनेक सामाजिक कार्यात कोणताही बडेजाव मोठेपणा न करता अनिकेत फाटक सहभागी होऊन आपले योगदान देतात. त्यांचा फायदा अमृता फाटक, ललित चव्हाण व नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत यांना निश्चित होईल.

प्रभागातील जनतेसाठी सदैव तयार

ललित चव्हाण यांनी गेल्या काही वर्षात आपल्या प्रभागातील समस्या जाणून घेवून वीज, रस्ते, पाणी यासाठी भाजप पक्षाच्या मदतीने मार्गी लावल्या. तसेच गरजूना वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत देताना शासकीय पातळीवरील योजनांचा लाभ ही या प - भागातील जनतेला मिळून देण्याचे काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी झटणारा युवा कार्यकर्त्या म्हणून ललित चव्हाण अशी ओळख निर्माण झाली.

शासकीय योजनांचा अनेकांना मिळवून दिला लाभ

नगरसेवक नसताना सतत जनतेच्या संपर्कात राहून जनतेची सेवा करणारा शांत, संयमी, उच्चशिक्षित आणि जबादारीचे भान ठेवून अविरतपणे काम करणाऱ्या ललित हरी चव्हाण यांच्याबद्दल जनतेमध्ये विश्वास आणि आदर निर्माण झाल्याने आज जनतेचा मोठा पाठिंबा त्याला मिळत आहे. आधारकार्ड, कामगार कल्याणकार्ड, आयुष्मान भारत कार्ड अशा सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून त्यांचा लाभ गरजू जनतेला उपलब्ध करून देण्यात ललित चव्हाण याचा मोठा वाटा आहे.

सामाजिक उपक्रमात फाटक कुटुंबीय

अमृता फाटक यांचे पती अनिकेत फाटक हे प्रभागातील जनतेच्या सुखदुखात नेहमी पुढाकार घेऊन सहभागी होत असतात. प्रभागातील शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान असते.

सबका साथ, सबका विकास

आपण विकसित भारताचे, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. ज्या विश्वासाने देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील जनतेने मतदान केले, आज तो विश्वास खरा ठरताना दिसत आहे. दोन्ही कार्यतत्पर नेत्यांच्या नेतृत्वात डबल इंजिन सरकार गतिमान पद्धतीने पुढे जाताना दिसत आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास' हे ब्रीद वाक्य केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्ष कृतीत,प्रत्यक्ष अंमलात येत आहे. राष्ट्र नवनिर्माणच्या या प्रक्रियेत आपल्याला अजून अनेक टप्पे गाठायचे आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा आहे. यासाठी आपलं ‘मत’ अत्यंत महत्वाचं आहे.

नागरिकांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार

आपल्या मालवण या वैभवशाली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. आपणामुळे यापूर्वीही भारतीय जनता पक्षाला याठिकाणी संधी मिळाली. त्यातून येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेला दिलेली अभिवचने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मालवण हे शहर देशभरात नावारुपाला आले आहे. याच शिदोरीवर आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत.

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद पाठीशी

भाजपचे नेते खासदार नारायण राणे, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्याला अनेक सन्मान प्राप्त करून देणारे, जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे हे आमचे नेते आहेत. या मान्यवरांच्या नेतृत्वात मालवण नगरपालिका निवडणूक आम्ही महिला भगिनी, युवामित्र यांच्यासह सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा सर्वांगीण विकास नक्की साधू, असा विश्वास उमेदवार ललित हरी चव्हाण व सौ. अमृता अनिकेत फाटक यांनी व्यक्त केला आहे.

rapan bottom