Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अटक; संशयीताची सशर्त जामीनावर मुक्तता

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अटक; संशयीताची सशर्त जामीनावर मुक्तता

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले

मालवण : मालवण तारकर्ली येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून दाखल गुन्ह्यातील संशयीत कार्तिक पंकज गांगनाईक वय 34 वर्षे राह. तारकर्ली ता. मालवण याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालवण यांनी रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

याकामी फिर्यादी यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीला कोणत्यातरी अज्ञात कारणाने संशयीताने दि. 2/11/2025 रोजी राहत्या घरातून पळवून नेल्याची तक्रार मालवण पोलिस ठाण्यात दिनांक 23/11/2025 रोजी दाखल केली. त्यानुसार मालवण पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरुद्ध भारतीय न्याय्य संहिता 2023 चे कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रमाणे मालवण पोलिसांनी संशयितास अटक करुन ताब्यात घेतले व प्राथमिक तपासकाम करून संशयितास दि. 23/11/2025 रोजी मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. संशयितास या गुन्हात कोणी मदत केली का इ. कारणासाठी 3 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली होती. संशयितांतर्फे गुन्ह्याचे स्वरुप जामीनपात्र असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आवश्यक रिकव्हरी व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून मे. न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

त्यानंतर संशयीतातर्फे जामीनअर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयिताची रक्कम रु. 15,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.

rapan bottom