Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

'त्या' विरोधी उमेदवारांवर शिवसेनेचा प्रहार

'त्या' विरोधी उमेदवारांवर शिवसेनेचा प्रहार

जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर यांनी पुरावेच दाखवले

शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा व्यक्त केला ठाम विश्वास

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी विरोधातील पक्षाने दिलेल्या काही उमेदवारांवर शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गावकर यांनी जोरदार टिका केली आहे. दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन ठेवून शिवसेना नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर व सर्व नगरसेवक उमेदवार उमेदवार यांना जनतेचा पाठिंबा मिळतं असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे राजा गांवकर यांनी सांगितले.

शिवसेना प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गावकर बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मालवणमध्ये स्वतःला शिवकन्या म्हणणाऱ्या एका उमेदवाराने गेल्या काही वर्षात एक स्किम आणली होती या स्किमच्या माध्यमातून शेकडो लोकांचे हजारो रुपये लुबाडले गेले. त्यांनी एका गरीब मुलाच्या नावे ते लायसन दिल गेल. आणि त्यामाध्यमातून लोकांचे पैसे घेतले गेले. आणि आजही हे प्रकरण असच प्रलंबित आहे. कोणताही आचार विचार न घेता विरोधी पक्षाने त्यांच्याजवळ मोठी जबाबदारी दिली गेली, यामुळे मतदार त्यांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे असे गावकर यांनी स्पष्ट आहे.

मागील वर्षी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची दुर्घटना झाली त्यावेळी आमचे नेते यांच्या बाबत टिका करून चुकीचे शब्द वापरले होते. त्यामुळे अशा व्यक्तीची भाजपा पदाधिकारी यांनी माहिती का घेतली नाही. मुख्यमंत्री यांच्यावर देखील त्यांनी त्यावेळी आरोप केले होते. मग अशा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कशी काय उमेदवारी देऊ शकता. या उमेदवारी बाबत भाजपा नेते यांना अंधारात ठेवण्याचे काम केले जात असावे, असाही टोला श्री. गावकर यांनी मारला.

भाजपच्या एका उमेदवाराला तिकीट दिले आहे त्या उमेदवारावर निकाली काढलेल्या दारुच्या सहा केसेस आणि सर्व मिळून त्याच्यावर आज आठ केसेस आहेत. मालवणच्या जनतेने या उमेदवारांना विचार करुन मतदान करावे. मालवण वासियांनी ठरविले पाहिजे की, अशा व्यक्तींच्या हातामध्ये मालवणची सत्ता द्यायची की प्रामाणिक व्यक्तींना निवडूण आणायाचे हे ठरविले पाहिजे. शिवसेनेन ज्यापद्धतीने उमेदवार या निवडणुकीसाठी उभे केले आहेत अशा नव्या चेहऱ्यांना मतपेटीतून नागरिकांनी आपला कौल द्यावा. शिवसेनेच्या हातात सत्ता देऊन मालवणचा विकास करायचा की, अन्य पक्ष हाती सत्ता द्यायची हे ठरविले पाहिजे. असेही गावकर यांनी सांगितले.

rapan bottom