Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

विजयाची वर्षपूर्ती; आमदार निलेश राणे यांना पक्ष प्रवेशाची भेट

विजयाची वर्षपूर्ती; आमदार निलेश राणे यांना पक्ष प्रवेशाची भेट

मालवण तालुक्यातील अनेक उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

गावागावातील सर्व विकासकामे पुर्ण करणार; आ. निलेश राणे यांचा शब्द

शिवसेनेचा 'भगवा' मालवण नगरपरिषदेवर ही फडकणार : आमदार निलेश राणे

अमित खोत | मालवण : शिवसेना जनतेचा विश्वास जपणारा पक्ष आहे. याचं विश्वासावर आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरु आहे. जनतेला अपेक्षित असलेली सर्व विकासकामे पुर्ण केली जातील. मालवण शहराच्या ही सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकणार. असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

आमदार निलेश राणे यांच्या 'आमदार' विजयाची वर्षपूर्ती निमित्ताने मालवण शहर येथील प्रचार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मालवण तालुक्यातील आडवली मालडी जिप मतदारसंघातील निरोम, असगणी, ओवळीये व गोठणे उभा त्या पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेश करते यांचे शिवसेनेत स्वागत केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, संजय पडते, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, दादा परब, बाळू कुबल, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, मकरंद राणे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, संपर्क प्रमुख राजेश गांवकर पंकज वर्दम यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उबाठा माजी विभागप्रमुख बंडू चव्हाण, विभागप्रमुख संतोष घाडी, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, ओवळीये माजी सरपंच अंबाजी सावंत यांसह अनेक उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी आमदार निलेश राणे सातत्याने कार्यरत आहेत. मोठया प्रमाणात विकासनिधी खेचून आणत आहेत. सोबत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मतदारसंघात शिवसेनेचा परिवार वाढत आहे. शिवसेनेवर मालवण वासियांचे प्रेम असून मालवण नगरपरिषदेवर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी बाळू कुबल, बबन शिंदे, बंडू चव्हाण यांनी विचार मांडले.

शिंदे साहेब, राणे साहेब यांचा शब्द आम्ही नेहमी जपणार

शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांचा शब्द आम्ही नेहमी जपणार. शिवसेना मजबूत करणार, जनतेला अपेक्षित विकास साध्य करणार. सोबतच मालवण कुडाळ मतदारसंघातील जनतेचे उपकार विसरणार नाही. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व

विभागाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेऊन विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे माजी विभागप्रमुख दीपक उर्फ बंडू चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार निलेश राणे यांच्या वर्षभरातील सातत्यपूर्ण व गतिमान विकास कार्याचा त्यांनी यावेळी विशेष गौरव केला.

rapan bottom