Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

जेष्ठ निष्ठावंत शिलेदार शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात....

जेष्ठ निष्ठावंत शिलेदार शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात....

मालवण शहरात सांभाळत आहेत प्रचाराची प्रमुख आघाडी....

संदीप बोडवे | स्काय न्यूज नेटवर्क मालवण : मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा एकहाती फडकविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वात
शिवसेनेचे पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे शिवसेना पक्षात असल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनात घडलेले अनेक निष्ठावंत जेष्ठ पदाधिकारी आताही शिवसेनेकडून मालवण नगरपालिकेच्या प्रचाराची मुख्य आघाडी सांभाळत आहेत.

मालवण नगरपालिके मध्ये शिवसेना आणिं भाजपा यांची युती अपेक्षित असताना शेवटच्या काही दिवसात युती तुटली. आता भाजपा, शिवसेनेसह उद्धव ठाकरे सेने मध्ये आता तिरंगी लढत मालवणवासीयांना पहावयास मिळत आहे. 

खंदे शिलेदार मैदानात...

शिवसेनेकडून जुने खंदे शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये उमेश नेरुरकर, सूर्यकांत फणसेकर, बाळू तारी, जॉन नऱ्होना, शर्वरी पाटकर यांसह शहरावर मजबूत पकड आलेले कार्यकर्ते प्रचाराची प्रमुख आघाडी सांभाळताना दिसत आहेत.

पदाधिकाऱ्यांवर प्रचाराची प्रमुख धुरा...

तर दादा साईल, दीपालक्ष्मी पडते यांसह महेश कांदळगावकर, बबन शिंदे, अनिल कांदळकर, राजा गावडे, आनंद शिरवलकर, सुधीर साळसकर, संतोष साटविलकर, छोटू ठाकूर, उल्हास तांडेल, राजा गांवकर, शेखर गाड, परशुराम पाटकर, संग्राम साळसकर, प्राजक्ता शिरवलकर, अभि गावडे, अनंत धडाम, प्रितम गावंडे, राजू बिडये, मंदार लुडबे, दादा नाईक, संदेश चव्हाण, मधुरा तुळसकर, सेन्हा घाडीगावकर, चांदणी कांबळी, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली आहे.

नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर, शहर प्रमुख दीपक पाटकर, शहर प्रमुख पुनम चव्हाण प्रचार यंत्रणेत सक्रिय...

आमदार निलेश राणे यांनी ममता वराडकर या नगराध्यक्षा उमेदवार जाहीर केल्यापासून अनेक स्तरातून त्यांना पाठिंबा वाढत आहे. त्या सर्व शिवसेना उमेदवारा सोबत सक्रियपणे प्रचारात आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक पाटकर हे स्वतः प्रभाग 3 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. तर महिला शहरप्रमुख पुनम चव्हाण याही प्रभाग चार मधून उमेदवार आहेत. तरीही ते मालवण शहरातील सर्व प्रभागातील प्रचार यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पूनम चव्हाण यांच्या रूपाने शिवसेनेला अभ्यासू आक्रमक आणि डॅशिंग नेतृत्व मिळाले आहे. दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यशैली मुळे सातत्याने शिवसेना पक्षात होत असलेल्या प्रवेशामुळे शहरात शिवसेनेला मोठी उभारी मिळत आहे. संघटना मजबूत होत आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

rapan bottom