मालवण शहर प्रभाग नऊ व दहा येथे उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार फेरी
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा झंजावाती प्रचार सर्वच प्रभागात सुरू आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन घेऊन शिवसेना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांसह सर्व नगरसेवक उमेदवार बहुमताने विजयी होतील. शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
प्रभाग नऊ शिवसेना उमेदवार महेश कोयंडे, प्रमिला मोरजे प्रभाग दहा येथे शिवसेने उमेदवर सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांच्या प्रचारार्थ प्रभागात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्स्फूर्त प्रचार फेरी काढण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गांवकर, सूर्यकांत फणसेकर, संदेश चव्हाण, मंदार लुडबे यांसह शिवसेना पदाधिकारी नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
फोटो : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहर प्रभाग नऊ, दहा येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्स्फूर्त प्रचार फेरी काढण्यात आली. (अमित खोत, मालवण)

