आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार : शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे हे विकासाची दुरादृष्टी असणारे नेतृत्व आहे. मालवण शहरविकासासाठी त्यांनी व्हिजन निश्चित केले आहे. त्याला जनतेची निश्चित साथ मिळणार आहे. शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर या स्वच्छ प्रतिमा, संवेदनशील नेतृत्व आणि मालवणच्या विकासाची विश्वासू दिशा आहेत. मालवणच्या जनतेमध्ये आदराचं स्थान मिळवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सौ. ममता वराडकर आहेत.
वर्षानुवर्षांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात त्या नेहमीच लोकांशी जोडून, त्यांच्या अडचणी समजून आणि त्यांच्या सोबत उभं राहून काम करत आल्या आहेत. त्यामुळे वराडकर यांसह शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हा प्रवक्ते व्यक्त केला आहे.
आदराने बोलणं, प्रत्येकाला मान–सन्मान देणं आणि प्रामाणिकपणे काम करणं ही ममता वराडकर यांची जन माणसातील ओळख आहे.
शहरातील स्वच्छता, पाणी, रस्ते, महिलांच्या समस्या, तरुणांना रोजगाराच्या संधी प्रत्येक मुद्द्यावर त्यांची भक्कम भूमिका दिसून येत आहे. कुठलेही गाजावाजा न करता शांतपणे, परंतु प्रभावीपणे काम करण्याची त्यांची पद्धत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करते.
महत्त्वाचं म्हणजे इतक्या वर्षांच्या सार्वजनिक कार्यात त्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे नाव कधीही कोणत्याही भ्रष्टाचारात आले नाही. ही त्यांची सर्वात मोठी ताकद आणि मालवणसाठी आवश्यक अशी स्वच्छ प्रतिमा आहे.
आज मालवणला गरज आहे अशाच एका प्रामाणिक, संयमी, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्वाची.
शहराचा सुयोग्य, नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास शक्य होईल असे सक्षम नेतृत्व सौ. ममता वराडकर यांच्याकडे आहे.
मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शी प्रशासनासाठी सौ. ममता वराडकर हा एक विश्वासाचा चेहरा आहे. त्यांना भक्कम साथ आमदार निलेश राणे यांची आहे. त्यामुळे मालवण शहराच्या विकासाची नवे दालन खुले होईल. अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आला. असेही राजा गांवकर यांनी स्पष्ट केले.

