शिवसेनेचे उमेदवार बहुमताने विजयी होतील : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहरात सर्वच प्रभागात उत्स्फूर्त प्रचार सुरु आहे. प्रभाग सात येथील शिवसेना प्रचार कार्यालयाचे उदघाटन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर, प्रभाग सात नगरसेवक उमेदवार मेघा गांवकर, नरेश हुले यांसह प्राजक्ता शिरवलकर, चांदनी कांबळी, नैना मांजरेकर, अभि गावडे, दिपक नारकर, बबन शिंदे, राजा गावकर, उमेश नेरुरकर, बाळू तारी, भाऊ चव्हाण, शेखर गाड, अंकित नेरुरकर, प्रमोद राणे, प्रसाद मोरजकर, मिलिंद घाडगे, मुकुंद पारटे, प्रकाश पावसकर, राजन परब, स्वप्नील गावडे, परशुराम परब, अरविंद परब, सागर कुशे, गीतांजली लाड, अपर्णा कोळथलकर, महादेव गावडे, नितेश पेडणेकर, अभय कदम यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो : शिवसेना प्रचार कार्यालयाचे प्रभाग सात मध्ये उदघाटन करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

