शिवसेना मेढा शाखाप्रमुखपदी नियुक्ती
मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग सात अ मधून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सामाजिक कार्यकर्ते नितेश प्रकाश पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पेडणेकर यांची शिवसेना मेढा शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मालवण मेढा येथील सामाजिक कार्यकर्ते नितेश पेडणेकर यांनी मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. नितेश पेडणेकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते पेडणेकर यामध्ये शिवसेना मेढा शाखाप्रमुख पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी उमेश नेरुरकर, राजा गांवकर, बबन शिंदे, दीपक पाटकर, नरेश हुले, अभय कदम, शेखर गाड, जॉन नरोना, शितल पेडणेकर आदी व इतर उपस्थित होते.

