Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी सज्ज व्हा : आ. निलेश राणे

शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी सज्ज व्हा : आ. निलेश राणे

दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊन शिवसेना उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ

मालवण : मालवण नगर परिषदेत शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर व सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.

यावेळी दांडेश्वर देवाचे आशीर्वाद घेऊन मालवण नगरपरिषद शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग 9 मध्ये करण्यात आला. शिवसेना प्रचार कार्यालयाचे उदघाटनही यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर, नगरसेवक उमेदवार महेश कोयंडे, सौ. प्रमिला मोरजे, विधानसभा प्रमुख बबन शिंदे तसेच अनेक नागरिक उत्साहाने उपस्थित होते.

श्री देव दांडेश्वर मंदिरात आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. स्थानिक मुद्दे, विकासाच्या संधी आणि आगामी निवडणुकीतील जनतेच्या अपेक्षा यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, नागरिक यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.

शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह नगरसेवक उमेदवार यांना प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात सक्रियपणे प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतं आहे.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom