Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटीबद्ध

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटीबद्ध

नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर यांचा घरोघरी प्रचार

नगरसेवक उमेदवार सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर यांसह नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती



मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता मोहन वराडकर यांच्या माध्यमातून घरोघरी उत्स्फूर्तपणे प्रचार केला जात आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती सर्वच ठिकाणी मोठया संख्येने दिसून येत आहे. मेढा, राजकोट परिसरात नगरसेवक उमेदवार सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसादात घरोघरी प्रचार करण्यात आला.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात जनतेला अपेक्षित अश्या मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध राहू. असे ममता वराडकर यांनी स्पष्ट केले आहे.



सर्व ठिकाणी नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळतं असून सर्वासामान्य जनतेचे हक्काचे नेतृत्व म्हणून ममता वराडकर यांच्याकडे पाहिले जात आहे. मालवणवासीय जनतेच्या पाठिंब्यावर ममता वराडकर यांचा विजय निश्चित होईल. दोन वेळा नगरसेविका असलेल्या ममता वराडकर या स्वच्छ प्रतिमेच्या आणि सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व आहेत. आपलेसे वाटणारे हे नेतृत्व जनतेच्या मनात आहे. सोबत आमदार निलेश राणे यांची भक्कम साथ आहे. त्यामुळे नगराध्यक्षा म्हणून त्यांना अधिक पसंती मिळतं असल्याचा विश्वास सर्व प्रभागातून व्यक्त केला जात आहे.

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिलेल्या नियोजनानुसार प्रत्येक प्रभागात प्रभारी निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी एकसंघपणे प्रचार यंत्रणेत सहभागी आहेत. नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार ही उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभागी झाले असून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

rapan bottom