Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

बचतगटांच्या महिलांवर प्रचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न

बचतगटांच्या महिलांवर प्रचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न

काही पक्षांकडून सुरु आहे प्रकार : पुन्हा असे घडल्यास आम्ही शांत बसणार नाही

शिवसेना मालवण शहरप्रमुख सौ. पुनम चव्हाण यांनी दिला इशारा

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिका निवडणुकीचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. शहरातील बचतगटांच्या महिलांवर सिआरपी यांच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रकार भाजपा व अन्य पक्ष स्थानिक पदाधिकारी यांच्या माध्यमातून घडत आहे अशी माहिती मिळाली आहे. नगरपालिका निवडणूक खेळीमेळीत आणि शांततेत होण्यासाठी शिवसेना प्रयत्नशिल असताना काहींकडून दबाव आणला जात आहे. बचतगटातील महिलांवर पक्षाच्या प्रचाराच्या बैठकांसाठी दबाव टाकल्यासआम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुख पुनम चव्हाण यांनी दिला आहे.



शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. चव्हाण बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, निना मुंबरकर, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक प्रियांका मेस्त्री, उपतालुकाप्रमुख पुजा तोंडवळकर, स्नेहा घाडीगावकर, कुडाळ महिला शहर प्रमुख तथा नगरसेविका श्रृती वर्दम, कोळंब माजी सरपंच प्रतिभा भोजने, संगीता मुंबरकर आदी उपस्थित होते. टाकण्यात येत असलेल्या दबावाचे पुरावे आमच्याकडे आहेत. आम्ही अजुनही शांततेत आणि खेळीमेळीत निवडणूक होण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. शिवसेना आमदार नीलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली १०० टक्के यश मिळविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. असे असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने त्यांच्याकडून बचतगटांना टार्गेट केले जात आहे. याची सविस्तर माहिती आमच्याकडे आहे, असेही सौ. चव्हाण म्हणाल्या.

बचत गटाच्या महिलांवर भाजप पक्ष तसेच इतर पक्ष दबाव टाकून त्यांच्या होणाऱ्या मिटींगला येण्यास सांगितले जाते. मालवण शहराच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठल्याही बचत गटाच्या महिलेवर अशाप्रकारे दबाव टाकत असतील तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून हे खपवून घेणार नाही. ज्या ज्या वेळेला या गोष्टी आमच्या निदर्शनास येतील त्या त्या वेळी त्याठिकाणी त्यांना प्रत्युतर देण्यात येईल. बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव यांच्यावर राजकीय पक्ष दबाव टाकत मिटींगला येण्यासाठी तसेच प्रचार यंत्रनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करतील त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत. मालवण शहर हे सुशिक्षित असल्याने या निवडणुकीमध्ये मत पेटीतून मतदार नक्कीच योग्य तो कौल देतील. मालवण शहराचा सर्वांगिण विकास होत असतानाच आमदार निलेश राणे यांचे हात बळकट केल्यास होणारा विकास अजून गतिमाम होईल, असाही विश्वास सौ. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

मतपेटीतून शिवसेनेची ताकद दिसून येणारच आहे. विकासाकामांतूनही आम्ही सर्वांच्या पुढे आहोत. आम्ही प्रचराला सुरुवात करताना मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वराच्या चरणी लीन होऊन भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका बनविण्याची शपथ घेतली होती. मालवण नगरपालिका हे एक मंदिर आहे त्यामुळे तेथे समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकाला समाधानी करावे. मालवण शहराचा विकास करावा यासाठीच आम्ही प्रयत्नाशील राहू. घेतलेली शपथ आम्ही मालवण वासियांचा विश्वास म्हणुन जपणार आहोत. या निवडणुकीत मालवण वासियांचे प्रेम आशिर्वाद आमच्या सोबत असतील असे चव्हाण म्हणाल्या.

नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर अनुभवी

शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौं. ममता वराडकर या दोन टर्म नगरसेविका राहिल्या असून अनुभवी उमेदवार आहेत. त्यांनी नगरपालिकेत विविध समित्यांवर काम करत आपली ओळख निर्माण केली आहे. माता भगिनी यांचा पाठिंबा ममता वराडकर यांना मिळतं आहे. शांत, संयमी व जनतेत मिसळणारे असे हे नेतृत्व आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नगराध्यक्ष पदासाठी तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवक उमेदवारांना निश्चित होईल. असा विश्वास पुनम चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.


अमित खोत, मालवण

rapan bottom