नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत व सर्व भाजपा उमेदवार विजयी होणार
व्यक्त करण्यात आला विश्वास

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे कणखर नेतृत्व आहेत. ते जगाचेही नेतृत्व करू शकतात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या माध्यमातून जनहिताचे अनेक निर्णय व गतिमान विकास सुरु आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, सर्व प्रश्न तेच सोडवू शकतात. तर भाजपा नेते नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ खासदार आहेत. त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपाला मत म्हणजे खासदार नारायण राणे यांना मत. जनतेच्या घराघरात जाऊन प्रचार करा. असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे बोलताना केले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्या सामाजिक कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत व सर्व भाजपा उमेदवार यांच्या विजयाचा व्यक्त करण्यात आला विश्वास.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे बुधवारी रात्री मालवण दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपा मालवण कार्यालय येथे प्रत्येक प्रभागातील उमेदवारांशी त्यांनी वैयक्तिक चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, निवडणूक प्रभारी रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, अशोक तोडणकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, राजू परूळेकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यासंह सर्व उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपने केलेलं कार्य सर्वांनी जनतेपर्यंत घेऊन जा. प्रत्येक घरात जाऊन जनतेशी संवाद साधा. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांतून जनतेला होत असलेल्या फायदा हाही सर्वांना सांगणे आवश्यक आहे. देशात, राज्यात आणि शहरात एकच सत्ता असल्यास आपण जोमाने शहर विकास करू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात भाजपची असलेली ताकद यामुळे आम्हाला खरंतर बाय मिळणे आवश्यक होते. काही लोक कशाला मते मागत आहेत, हेच समजून येत नाही. आपले मत फुकट जावू नये म्हणून कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. मत्स्यद्योग खाते हे नितेश राणे यांच्याकडे असल्याने याठिकाणच्या मच्छीमारांचे तसेच इतरही प्रश्न सोडविण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने मतदारांपर्यंत पोहचून भाजपचे काम पटवून दिले पाहिजे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

