Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ !

भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ !

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर देवतां चरणी सर्व उमेदवार नतमस्तक

जनतेच्या आशिर्वादाने नराध्यक्ष उमेदवार सौं. शिल्पा यतीन खोत यासंह सर्व नगरसेवक उमेदवार बहुमताने विजयी होतील

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला विश्वास




मालवण : भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या उत्साहात मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत असून मालवण शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास या मुद्द्यावर भाजपाचे नराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौं. शिल्पा यतीन खोत यासंह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार बहुमताने विजयी होतील. असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.

मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर देवताना श्रीफळ ठेऊन करण्यात आला.



▪️ नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौं. शिल्पा खोत यांचे नाव जाहीर झाल्या नंतर सर्वच स्तरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतं आहे. हिंदुत्ववादी विचारांच्या आणि शिवभक्त म्हणून सामाजिक सेवा कार्यात नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या शिल्पा खोत या सर्वसामान्य जनतेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतं आहे. त्यामुळे जनतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्याने व आशीर्वादाने नगराध्यक्षा उमेदवार शिल्पा खोत व सर्व भाजपा उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.



▪️शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहू : शिल्पा खोत

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास व जनतेची सेवा करण्यासाठी सर्वच उमेदवारांना मालवण वासिय जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करेल. भाजपच्या माध्यमातून मोठा विकासनिधी मालवण शहर विकासासाठी आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटीबद्ध राहू असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी यावेळी व्यक्त केला.



यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, निवडणूक प्रभारी रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा सचिव विजय केनवडेकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, विकी तोरसकर, दिलीप वायंगणकर, किशोर खानोलकर महिला शहर उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, रश्मी लुडबे, राणी पराडकर, प्रतिभा चव्हाण, पूजा वेरलकर, अस्मिता निव्हेकर, यासंह मालवण शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, पंकज सादये, सुवर्णा वालावलकर, रोहन पेंडुरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, दीपाली वायंगणकर, सौरभ ताम्हणकर, संतोष शिरगांवकर, मरीना फर्नांडिस, सन्मेष परब, सेजल परब, अन्वेशा आचरेकर, रमेश हडकर, आदी उपस्थित होते. घरोघर प्रचाराचा शुभारंभ ही नागरिकांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला. यावेळी नागरिकांनीही उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या.



▪️ प्रचार सभा होणार

भाजपा उमेदवार यांना मार्गदर्शन व प्रचार यंत्रणेचा आढावा पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत. आज सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे मालवण भाजपा कार्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे साहेब यांची प्रचार सभा मालवणात व्हावी यासाठी नियोजन सुरु आहे. एकूणच घरोघर भाजपा उमेदवार प्रचार करतं असून सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतं आहे. असे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

rapan bottom