Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पूजा करलकर यांनी ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज केला दाखल…

पूजा करलकर यांनी ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज केला दाखल…

मालवण पालिका निवडणूक २०२५

मालवण : नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केलेल्या पूजा करलकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज ठाकरे शिवसेननेकडून दाखल केला. पालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार असले तरी सर्व उमेदवारांशी चर्चा करून करलकर यांना ही संधी देण्यात आली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, या निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासह जे उमेदवार नगरसेवक पदासाठी देण्यात आले आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते एका तत्त्वाशी ठाम राहिलेले उमेदवार आहेत. असे नाईक यांनी स्पष्ट केले. . नाईक म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीसाठी जो चेहरा हवा तो अनुभवी असायला हवा. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांना कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. कारण त्यांनी नगरसेविका म्हणून चांगले काम केले आहे. त्या कोणताही डाग नसलेल्या उमेदवार असून सर्व लोकांना विश्वासात घेऊनच पालिकेचा कारभार हाकतील. मालवण पालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आल्यास जिल्हा नियोजन पालिकेचा फंड आणि पडून असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून आमचे प्रामाणिक उमेदवार शहराचा कायापालट निश्चितच चांगल्या पद्धतीने करतील. जाती-धर्म-पक्ष भेद विसरून आमचे उमेदवार काम करतील तसेच पालिकेच्या कारभारावर शहरवासीयांचाही अंकुश राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर यांनी यावेळी सांगितले की, मालवण पालिकेत नगरसेविका म्हणून १९ वर्षे नेतृत्व केले आणि भाजपची नगरसेविका म्हणूनही काम केले. ठाकरे शिवसेनेने मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. जनतेतून तू नगराध्यक्ष झाली पाहिजे, अशी शहरवासीयांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे मला या निवडणुकीत निश्चितच सहकार्य आणि मतदानरुपी आशीर्वाद मिळतील, असा विश्वास वाटतो. माझ्यासोबत जे नगरसेवक, नगरसेविका पदाचे उमेदवार आहेत. त्यांनाही निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले.

rapan bottom