Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेना उमेदवारांनी घेतली पारदर्शक कारभाराची 'शपथ'

शिवसेना उमेदवारांनी घेतली पारदर्शक कारभाराची 'शपथ'

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर देवातांसमोर नतमस्तक

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मारकास अभिवादन

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण नगरपालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास साध्य करताना जनतेची सेवा करायची आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक म्हणून जनतेने संधी दिल्यास कुठेही भ्रष्टाचाराला थारा न देता पारदर्शक कारभार हेच लक्ष राहील. नगरपालिका हे मंदिर माणून या मंदिरात सुशासन येण्यासाठी मालवण वासियांना अपेक्षित विकास करण्यासाठी जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम केले जाईल. आमदार नीलेश राणे यांना अभिप्रेत असलेला सर्वांगिण विकास करण्यासाठी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कटीबद्ध आहोत. अशी शपथ शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी मालवणचे ग्राम दैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर चरणी नतमस्तक होत घेतली. नगरपरिषद निवडणूक निमित्ताने अश्या प्रकारे उमेदवारांनी घेतलेली पारदर्शक कारभाराची शपथ लक्षवेधी ठरली असून नागरिकांमधूनही चांगल्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

शिवसेनेचे सर्व उमेदवार जनतेशी नाळ जुळलेले आणि स्वच्छ प्रतिमेचे आहेत. नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर यांसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होउदे. असे साकडे देवता चरणी श्रीफळ अर्पण करून यावेळी घालण्यात आले.

श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर चरणी नतमस्तक होत शिवसेना उमेदवारांनी घेतली पारदर्शक कारभाराची 'शपथ'. (अमित खोत, गणेश गांवकर)

मालवण शहर देऊळवाडा येथील श्री नारायण मंदिर, श्री देव रामेश्वर मंदिरात नतमस्तक होत तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मारकास अभिवादन करून आणि राजकोट येथील महापुरुष मंदिरात आशीर्वाद घेऊन कुडाळ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण नगरपरिषद निवडणूकसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.

मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकहिताच्या कामांना नवी गती देण्यासाठी हा प्रचारयज्ञ सुरू झाला आहे. मालवणच्या प्रत्येक नागरिकांच्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक सक्षम होईल. शहराच्या प्रगतीसाठी, जनतेच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा देण्यासाठी हा शुभारंभ उत्साहात पार पडला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, जिल्हा सचिव दादा साईल, उमेश नेरुरकर, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, स्वप्नाली नेरुरकर, नगराध्यक्ष उमेदवार सौ. ममता वराडकर, श्री. दीपक पाटकर शिवसेनेचे उमेदवार वसंत गावकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, निना मुंबरकर, पुनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, विलास मुणगेकर, नंदिता वरवडेकर, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गावकर, राजन परूळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोर्जे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांसह
राजा गावकर, बबन शिंदे, विश्वास गावकर, अरूण तोडणकर, मोहन वराडकर, सौगंधराज बादेकर, संदेश चव्हाण, राजू बिडये, राजन सरमळकर, अंकित नेरूरकर, परशुराम पाटकर, बाळू नाटेकर, शेखर गाड, रवी मालवणकर, विश्वास गावकर, अरूण तोडणकर, मोहन वराडकर, सौगंधराज बादेकर, संदेश चव्हाण, किसन मांजरेकर, मंदार लुडबे, भाऊ मोर्जे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेला अपेक्षित भ्रष्टाचारमुक्त कारभार मालवण पालिकेत दिसणार - दत्ता सामंत

शिवसेनेचे सर्व उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे निष्कलंक आहेत. कोणताही स्वार्थी भाव त्यांच्यात नाही. समाजकर्य करत असलेले नविन चेहरे आम्ही निवडणूक रिंगणात उतरविलेले आहेत. नगरपालिका हे एक मंदिर असून त्याठिकाणी समाजकार्य आणि शहराचा सर्वांगिण विकास करणारे लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत. जनतेला अभिप्रेत असलेला विकास आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आज आम्ही ग्रामदैवता रामेश्वरचरणी हीच शपथ घेतलेली आहे. जनतेचा विकास करणार आहोत, याठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.

राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांसमोर सर्वजण नतमस्तक झाले.

राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांसमोर सर्वजण नतमस्तक

राजकोट किल्ला याठिकाणी आमदार नीलेश राणे यांसह सर्व शिवसेना उमेदवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना नतमस्तक झाले. छत्रपतींचा आशिर्वाद घेत मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. (अमित खोत, गणेश गांवकर)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शिवसेनेच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हिंदू अस्मितेचे शिरोमणी, निर्धाराचे प्रतीक आणि लाखो शिवसैनिकांच्या हृदयात सदैव जिवंत असलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आमदार निलेश राणे व शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्य, विचार आणि अटल नेतृत्वाला नम्र आदरांजली वाहिली.

बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते…
ते एक विचार आहेत आणि महाराष्ट्रासाठी उभा केलेला अस्मितेचा भक्कम ध्वज आहेत. त्यांची निर्भीड भाषा, जनतेसाठीची निश्चययुक्त भूमिका आणि शिवसैनिकांवरील अपरंपार प्रेम आजही प्रत्येक शिवसैनिकाला प्रेरणा देते.
आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी— मालवणच्या भूमीत उभं राहून त्यांच्या शिकवणीची पुन्हा एकदा आठवण करण्यात आली. जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची, न्यायासाठी ठाम उभं राहण्याची आणि धर्म, संस्कृती व महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्याची बाळासाहेबांची तत्वं आजही आमच्या कार्याचा पाया आहेत, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि शिकवणुकीने प्रेरित होऊन, मालवणच्या विकासासाठी, शिवसेनेच्या तत्त्वांसाठी आणि महाराष्ट्राच्या गौरवासाठी आम्ही सदैव समर्पित राहू. असे सांगत आमदार राणे यांनी अभिवादन केले.

rapan bottom