पक्षप्रवेश नंतर थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी
मालवण : भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडून थेट उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उबाठा शिवसेनेकडून मालवण नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी पूजा करलकर यांना जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.

मालवणात उबाठा शिवसेनेचा भाजपला धक्का
