Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

Malvan | २१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार : आमदार निलेश राणे

Malvan | २१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार : आमदार निलेश राणे

मालवण शहर दांडी परिसरातील अनेक नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

मालवण : मालवण शहराचा गतिमान विकास होत असताना निधी कमी पडू देणार नाही. नगरविकासच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल. २१ व्या शतकातील मालवण शहर बनवणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन अनेक पक्षप्रवेश सातत्याने शिवसेनेत होत आहेत. मालवण नगरपरिषद प्रभाग 9 दांडी येथील महेश अशोक कोयंडे यांसह परिसरातील अनेक नागरिकांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. महेश कोयंडे यांना प्रभाग 9 मधून नगरसेवक उमेदवारी आमदार निलेश राणे यांनी जाहीर केली.

यावेळी जिप माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, संघटक राजू बिडये, मोहन वराडकर, जगदीश खराडे, घनशाम जोशी, अभि गावडे, कमलाकर कोचरेकर, संदीप मालंडकर, सचिन मोर्वेकर, निकीत वराडकर, मंदार लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अनेकांचा शिवसेना प्रवेश

दांडी येथील महेश अशोक कोयंडे यांसह दांडी परिसरातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात मुकुंद आचरेकर, हेमराज रोगे, मकरंद खवणेकर, चेतन जोशी, विष्णु जोशी, नानू रोगे, आनंद आचरेकर, गिरीधर आचरेकर, दत्ताराम जाधव, सदाशिव रोगे, धोंडी लोणे, बाबू जोशी, रविंद्र केळूसकर, सुरेश सनये, विलास लोणे, महेंद्र कोयंडे, ज्ञानदेव केळूसकर, हरिदास रोगे, अरविंद आचरेकर, यशवंत खवणेकर, संजय रोगे, किरण हुर्नेकर, विजय जोशी, नूतन रोगे, रसिका येरागी, मानसी कोयंडे, समीरा कोयंडे, मृणाल कोयंडे, ईश्वरी जोशी, जलवंती लोणे, नम्रता जोशी, योगिता जोशी, शितल रोगे, सुजाता रोगे, रीना मालंडकर, आर्या कुबल, चंद्रकला जाधव, मनिषा आचरेकर, हर्षदा रोगे, गायत्री रोगे, रुवी आडकर, तिलोत्तमा लोणे, दर्शना सादये, सुषमा जोशी, भारती रोगे, सीताबाई परब, गीता मसुरकर, गुलाब आचरेकर, विद्या जोशी, राधा आचरेकर, निलम लोणे, सुलभा खवणेकर, यमुना आचरेकर, गीता आचरेकर यांसह अन्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार निलेश राणे व्हिजन असलेले नेतृत्व : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे हे राणे साहेबांप्रमाणे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. वर्षभरात मोठा विकासनिधी त्यांनी मतदार संघात आणला. विधानसभेतील त्यांची मुद्देसूद भाषणे गाजली. विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जनतेने अनुभवली. मालवण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी निधी आणला. नळपाणी योजना आणली. विकासाची ही गती आगामी काळात अशीच सुरु राहील. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom