Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

"ज्ञानोबा माऊली - तुकाराम"! वैभववाडीतून पायी कोकण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

"ज्ञानोबा माऊली - तुकाराम"! वैभववाडीतून पायी कोकण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष हभप विश्वनाथ गवंढळकर यांनी दिंडीचे केले स्वागत

बापार्डे, वैभववाडी ते क्षेत्र पंढरपूर कार्तिकी पायी वारी सोहळा


वैभववाडी प्रतिनिधी : "ज्ञानोबा माऊली… तुकाराम!" या जयघोषाने वैभववाडी शहर भक्तिरसाने न्हाऊन निघाले; कारण एकात्मता वारकरी संप्रदाय आयोजित कोकण दिंडी वैभववाडीत दाखल झाली. देवगड–बापार्डे, वैभववाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर या कार्तिकी पायी वारीचे औचित्य साधत सायंकाळी दिंडीचे वैभववाडीत आगमन झाले.
येथील संभाजी चौकात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेला अश्व सर्वांचेच आकर्षण ठरला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि संत नामस्मरणाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता.
या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप विश्वनाथ महाराज गवंढळकर, कार्याध्यक्ष हभप संतोष राऊळ, खजिनदार हभप मधुकर प्रभूगावकर, सचिव गणपत घाडीगावकर, तसेच सदस्य प्रकाश सावंत व राजेश पडवळ यांनी उपस्थित राहून दिंडीचे स्वागत केले. कोकण दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांना हभप श्री. गवंढळकर महाराज यांनी शुभेच्छा दिल्या.
या दिंडीत एकात्मता वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप गणेश गिरकर, उपाध्यक्ष रवींद्र पाटकर, सचिव अनिल पाळेकर, सहसचिव राजेश पडवळ, संजय नाईकधुरे, संजय गुरव, प्रकाश सुतार यांच्यासह अनेक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोकण दिंडीची ही पायी वारी भक्ती, एकात्मता आणि संत परंपरेचा अखंड वारसा जपत पंढरपूरच्या दिशेने पुढे निघाली आहे.

ruchira top