Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आंबेरी श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात भजन महोत्सव जागराचा कोजागिरी पासून प्रारंभ..!

आंबेरी श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात भजन महोत्सव जागराचा कोजागिरी पासून प्रारंभ..!

महिना भर जिल्ह्यातील भजनी मंडळे करणार हरींनामाचा जागर

१३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर, जिल्हास्तरीय भजन स्पर्धा : २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर, तालुका स्तरीय भजन स्पर्धा.

मालवण : आंबेरी गावचे ग्रामदैवत श्री देव जैन सकलेश्वर मंदिरात ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत "जागर भजन महोत्सव २०२५" वर्ष ७ वे चे आयोजन करण्यात आला आहे. या निमित्त मंदिरात दरोरोज सायंकाळी ७.३० वाजता आरती रात्रो ८ वाजता संगीत भजने तर १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर, जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आणि २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर, तालुका स्तरीय भजन स्पर्धा होणार आहेत. या भजन जागर महोत्सवाचे उद्घाटन आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपसरपंच रविंद्र परब, गावकर, भरत परब, विराज परब, पुजारी. विठ्ठल गुरव, पंचायत समिती माझी सदस्य श्रद्धा केळुसकर, ग्रामपंचायत सदस्य, मळा पोलिस पाटील, धनंजय आंबेरकर, तानाजी परब, बाबू कांबळी, धानजी चव्हाण, आदि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्र संचालन राजा सामंत यांनी केले. या भजन जागर महोत्सवाच्या सुरुवातीलाच पावणाई देवी प्रासादिक वारकरी दिंडी भजन कींजवडे देवगड बुवा विलास बगाड, यांनी उत्कृष्ट देखावे सादर करून सुश्राव्य भजन केलेचे सादरीकरण करून उपस्थित भजन रसिकांची मने जिंकली.

दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री ब्राह्मदेव प्रासादिक भजन मंडळ नेरुर कविलगाव बुवा ओमकार म्हाडदळकर, श्री भालचंद्र प्रसादिक भजन मंडळ पावशी बुवा आशिष तवटे, ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ धामापूर बुवा सागर थवी, साई इंटरटेनमेंट निर्मित हर्षनाद प्रस्तुत शिवनाद ब्रम्ह,गायक हर्षद मेस्त्री, साक्षी मांजरेकर, निवेदक निलेश गुरव, कीबोर्ड- महेश तळगावकर, तबला- सचिन कुडतरकर,ऑक्टोपॅड-हर्षद खराडे, ढोलकी पखवाज युवराज कुर्ला, गुरुवार ९ ऑक्टोबर २०२५ रोजी कला निर्मित स्वयंभू फुगडी मंडळ कणकवली बांधकरवाडी, मोबरेश्वर वारकरी संगीत भजन मंडळ देवबाग बुवा दिनेश राऊळ आशिक तोरस्कर, शुक्रवार १० ऑक्टोंबर २०२५ बाल गोपाळ प्रासादिक भजन मंडळ धामापूर गावडेवाडी बुवा संजय गावडे, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माड्याचीवाडी बुवा ऋषिकेश गावडे, शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ आंबेरी सुतारवाडी बुवा सुजय मिस्त्री, गांगेश्वर प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ किर्लोस बुवा दशरथ घाडीगावकर, रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी भगवती प्रासादिक भजन मंडळ देवली बुवा गितेश चव्हाण, गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ बुवा अद्वैत पालव,

जिल्हास्तरीय भजन स्पर्धा सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५

यात सोमवार दिनांक १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ रान बाबोळी बुवा साईश घाडी, श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ सातूली सावंतवाडी बुवा अमित परब, मंगळवार दिनांक १४ ऑक्टोबर श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ न्हावेली घोडेमुख बुवा रोहित निर्गुण, श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी बुवा प्रसाद आमडोस्कर, बुधवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी श्री चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ सुरंगपाणी वेंगुर्ला बुवा अनिकेत भगत, श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ अणसुर वेंगुर्ला बुवा हर्षल मेस्त्री, गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ वर्दे बुवा नरेंद्र मेस्त्री, श्री साई खोडदेश्वर प्रासादिक भजन पिंगुळी बुवा गौरव धुरी, शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ब्राह्मण प्रासादिक महिला भजन मंडळ पावशी बुवा सौ. प्रियांका तवटे, श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ घोडगे बुवा हर्षद ढवळ,

शनिवार दी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गिरोबा प्रासादिक भजन मंडळ बावखोल बुवा भरत जाधव, महापुरुष प्रासादिक वारकरी भजन मंडळ चुनवरे बुवा दिवाकर सावंत, रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गजानन प्रासादिक महिला भजन मंडळ अंबेरी गोसावीवाडी बुवा सृष्टी गोसावी, सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ जाणवली बुवा दुर्गेश मिठबावकर,

तालुकास्तरीय भजन स्पर्धा दिनांक २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२५

सोमवार दिनांक २० रोजी नृसिह संगीत साधना मंडळ पोईप राठीवडे बुवा अभिषेक मेस्त्री, श्री स्वामी समर्थ प्रसादीक भजन मंडळ कट्टा बुवा आदेश करावडे, मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी गिरोबा प्रसादिक भजन मंडळ नांदरुख बुवा गणेश चव्हाण, नृसिंह संगीत साधना महिला भजन मंडळ बुवा पूर्वा परब, बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री वेताळ मुंजेश्वर प्रसादीक भजन मंडळ पोईप बुवा ओंकार येरम, श्री विश्वकर्मा प्रसादिक भजन मंडळ राठीवडे बुवा अक्षय परूळेकर, गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी नृसिह संगीत साधना भजन मंडळ पोईप मालोंड बुवा ओंम परब, भगवती प्रसादिक भजन मंडळ देवली बुवा महेंद्र मराठे, शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी गांगेश्वर कृपा भजन मंडळ श्रावण मालवण बुवा विश्राम घाडी, हरिओम प्रासादिक भजन मंडळ कुणकावळे बुवा तन्मय परब,

शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ आमडोस बुवा गुरु कदम, मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ कणकवली नागवे बुवा अमेय आर्डेकर, रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी गावळदेव प्रासादिक भजन मंडळ अंबेरी मळावाडी बुवा शेखर आंबेकर, भैरवी जोगेश्वरी महिला फुगडी मंडळ कुडाळ, सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री भवानी प्रासादिक भजन मंडळ आंबेरी डिचोलकरवाडी बुवा अमित डिचोलकर, बाल गोपाल वारकरी भजन मंडळ आचरा बुवा मंदार आचारेकर, मंगळवार दि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी गवळदेव प्रसादिक भजन मंडळ आंबेरी मळावाडी बुवा सीमा मायनाक,श्री पांडुरंग प्रसादिक भजन मंडळ आंबेरी बुवा समीर मुणगेकर, बुधवार दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी ओम श्री आदिनाथ सिद्ध महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कणकवली बुवा दिव्या गोसावी, श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कातवड बुवा मंगेश नलावडे, गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी माऊली प्रसादिक भजन मंडळ आंबेरी हुर्णेवाडी बुवा दादा हडकर, गावळदेव प्रासादिक महिला भजन मंडळ आंबेरी मळावाडी बुवा रसिका मायनाक, शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संगीत साधना भजन मंडळ ओरोस खुर्द बुवा अमित मेस्त्री, आंबेरी गावातील कलाकारांचा भावगीत व भक्ती गीतांचा भावमधुर कार्यक्रम.

शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी खाबदेवी प्रासादिक भजन मंडळ आंबेरी बुवा बाबू कांबळी, देव सत्पपुरुष प्रसादिक भजन मंडळ बाव बुवा विशाल राणे, रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ तुलसी विवाह, सोमवार दिनांक ३ नोव्हेंबेर २०२५ रोजी दत्त माऊली प्रसादिक भजन मंडळ बुवा प्रमोद गोसावी, घुमडाई प्रसादिक भजन मंडळ घुमडे बुवा नाना सामंत,मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार महेश परब कुडाळ आंदुर्ले प्रस्तुत "भजनारंग आणि ढोलकी भुलली अभंगाला सावे घेऊन तबल्याला" असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ भजन रसिकानि घ्यावा असे आवाहन श्री देव जैन सकलेश्वर देवस्थान आंबेरी ग्रामस्थ मंडळच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom