सांगली येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
मालवण : जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल देवबागच्या विद्यार्थ्यानी बाल गट आणि कनिष्ठ गटातून मुलांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची सांगली येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव ओरोस येथे पार पडली. यात डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल देवबागच्या विद्यार्थ्यानी बाल गट आणि कनिष्ठ गटातून चांगले यश संपादन केले.
सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा २०२५-२६, १४ वर्षे मुलगे, वेदांत संकेत घाटवळ, ५० मी.बटरफ्लाय,प्रथम, कौस्तुभ नंदादीप चोपडेकर ५० मी. बटरफ्लाय. द्वितीय, संकल्प कमलाकर खोबरेकर ५० मी. बॅकस्ट्रोक, द्वितीय, सांघिक ४ बाय १०० मीटर रिले.प्रथम , नेहाल उद्धव राऊळ, वेदांत संकेत घाटवळ, कौस्तुभ नंदादीप चोपडेकर, संकल्प कमलाकर खोबरेकर, १७ वर्षे मुलगे, हितेश ज्ञानेश्वर तुळसकर, २०० मी, फ्रीस्टाइल, प्रथम ५० मी.फ्रीस्टाइल, तृतीय , गणेश नंदादीप चोपडेकर,२०० मी.फ्रीस्टाइल, द्वितीय,५० मीटर बॅकस्ट्रोक, द्वितीय,सुमित नामदेव चोपडेकर,५० मी. बॅकस्ट्रोक, प्रथम, सांघिक, ४ बाय १०० मीटर रिले, प्रथम, कार्तिक प्रशांत चोपडेकर, सुमित नामदेव चोपडेकर, गणेश नंदादीप चोपडेकर, हितेश ज्ञानेश्वर तुळसकर.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, संस्था पदाधिकारी आणि सदस्य पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
▪️अमित खोत | मालवण

