Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती

अमित खोत | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनतेतून पहिल्या टप्प्यात २४ कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे.

मालवण कुडाळ मतदार संघात आता पहिल्या टप्प्यात २४ कोटी निधी मंजुरी बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार व्यक्त करताना खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आगामी काळातही मोठया प्रमाणात विकासनिधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मतदार संघात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नाशील असणारे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जनसुविधा अंतर्गत ४ कोटी ६८ लक्ष, नागरी सुविधा अंतर्गत १ कोटी ५० लक्ष, ग्रामीण मार्गसाठी २ कोटी ५० लक्ष, क वर्ग यात्रास्थळ विकास साठी १ कोटी, इतर जिल्हा मार्गसाठी १ कोटी ५० लक्ष, नवीन ट्रान्सफार्मर व स्ट्रीट लाईट साठी २ कोटी, शाळा इमारती साठी १ कोटी ६० लक्ष, लहान मासेमारी बंदरांचा विकास १ कोटी ७७ लक्ष  असा सुमारे २४ कोटी निधी वरील विविध हेड खाली पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे.



गेल्या दहा महिन्यात आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात शेकडो कोटी निधी मंजूर करून आणला. देवबाग किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने एकाचवेळी 158 कोटी निधी मंजूर करून घेत आमदार निलेश राणे यांच्या कामाची धमक दिसून आली. यापुढील काळतही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे अधिकाधिक विकासनिधी मंजूर करून आणतील. त्यांचे व्हिजन असलेला आदर्श मतदार संघ बनवतील असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

rapan bottom