Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करा!

सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांचे पालन करा!

मालवण पोलीस प्रशासनाच्या पर्यटन व्यावसायिकांना सूचना

मालवण : समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, अपघात टाळण्यासाठी पॅरासेलिंग सारखे सर्व साहसी जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाने सर्व पर्यटन व्यावसायिकांना आवाहन केले आहे. वेळागर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र असून ते सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्याची हवामानाची स्थिती पाहता पर्यटकांच्या आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. समुद्रात सध्या धोका असल्याने पर्यटकांनीही जलक्रीडा प्रकारात भाग घेणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील वेळागर येथील समुद्रात पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समुद्रात घोंगावणाऱ्या 'शक्ती' वादळामुळे समुद्र अशांत आहे. बंदर विभागाने दोन नंबरचा धोक्याचा बावटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर मालवण मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने दिले आहेत. मालवण पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठक घेऊन पर्यटन व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत.

वेळागर येथील घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी किनारपट्टी भागातील पर्यटन व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने मालवण पोलिस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, सुशांत पवार, श्री.पेडणेकर यांनी बंदर जेटी, दांडी, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग सह अन्य प्रमुख पर्यटन स्थळांवरील व्यावसायिकांची तातडीची बैठक घेण्यात आली.

rapan bottom