मालवण : गोठणे यशवंत वाडी येथील स्मशानभूमी शेड उभारणी बाबत ग्रामस्थांची मागणी माजी उप उपसभापती राजू परुळेकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जात आहे. जनसुविधा योजनेतून हे काम मंजूर झाले आहे.
रविवारी गोठणे गावचे गाव प्रमुख श्री दादा हाटले, राजु परुळेकर, माजी उपसरपंच बाळा परब, राजू लाड, घनश्याम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सोनाली पालांडे, अर्चना मुणगेकर, संतोष धुरी, दया हाटले, शुभम तावडे भाई जठार, मांजरेकर, महेश चिंदरकर, नागेश यांसह यशवंत वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती राजू परुळेकर यांनी दिली.

