कोजागिरीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सदाबहार मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम
५ व ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १२ या कालावधीत सादरीकरण
जेवण्याच्या बिलामध्ये ही विशेष सवलत
मालवण : हॉटेल रापण गलबत यांच्या वतीने कोजागिरीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सदाबहार मराठी हिंदी गीतांचा "स्वर चांदण"हा कार्यक्रम ५ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १२ या कालावधीत चौके येथील 'हॉटेल रापण गलबत' होणार आहे.

मालवण चौके येथील हॉटेल रापण गलबत फॅमिली रेस्टॉरंट यांच्या वतीने चटकदार, चमचमीत, खवय्येगिरी सोबत कोजागिरी चा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी हा "स्वर चांदण" हा कार्यक्रम होणार आहे. यात हिंदी मराठी गीतांचे नजराणे पेश केले जाणार आहेत. त्याच बरोबर खवय्यांना जेवणाच्या बिलात १० टक्के सूट ही दिली जाणार आहे.


