इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानच्या शाही गणेशोत्सवाची सांगता....

आचरा | उदय बापर्डेकर : गणपती बाप्पाच्या विसर्जनच्या वाटेवर ठिक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या ... सनईचे सुरेल सूर...बैंड पथकाचे सुश्राव्य वादन...ढोल ताशांचा अखंड गजर... भव्य दिव्य रथ....त्यावरील आकर्षक पुष्प सजावट अन गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह... आचरा समुद्रावर काहीसे भावूक झालेले वातावरण.....! पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले ते अश्रू.....! शनिवारी सायंकाळी गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी पहायला मिळाली.
आचरा येथील इनामदार देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेश मूर्तीचे हजारो भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संस्थानच्या शाही थाटात शनिवारी सायंकाळी झाले. गेले 39 दिवस समस्त आचरे वासियांनी मनोभावे केलेल्या सेवे नंतर गणपती बाप्पा आपल्या घरी निघाले. शनिवारी सायंकाळी सवाद्य मिरवणूकिणे गणपती बाप्पा चे आचरा समुद्रा मध्ये भक्ती मय वातावरणात विसर्जन करण्यात आले.या वेळी
अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते.

उत्सवाच्या सागंता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्येक्रम करण्यात आले. दु.१२ वा. श्रीच्या मूर्तीचे उत्तरपूजन करण्यात आली . आचरा देऊळवाडी, मेस्त्रीवाडी ग्रामस्थांनकडून आरती करण्यात आली.त्यानंतर दुपारी १वा. श्रींच्या विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला.
'श्री गजानन महाराज की जय' अशी ललकारी होताच तोफेच्या सलामीने शाही मिरवणुकीची सुरुवात झाली. देव रामेश्वर मंदिराकडून सुरू झालेली मिरवणूकित आचरे येथील 'स्वराज्य ढोल ताशा पथक' तसेच जय भवानी म्युझिकल बॅन्जो पथक (बोरवली) दाखल झाले होते. बिचवर फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक हळूहळू समुद्र किनारी सरकू लागली. रामेश्वर मंदिर ते आचरा तिठा, बाजारपेठ मार्गे भंडारवाडी, काझीवडा, गाऊडवाडी, आचरा बंदरमार्गे, पिरावाडी देव चव्हाटा येथे काही वेळ गणेश मूर्ती ठेवण्यात आली.

झुबेर काझी यांस कडून लाडू तर आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर यांस कडून शीतपेय तसेच ठीक ठिकाणी वाटेत आचरे गावातील ग्रामस्थांनकडून शीतपेय, लाडू , मोदक प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात आले. तिथे श्री च्या गणेश मूर्ती चे मच्छिमार बांधवांनी दर्शन घेतले. पुन्हा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सुमारे सहा तास सुरू असलेल्या या विसर्जन मिरवणुकीत आचरा दश क्रोशीतील ग्रामस्थ,स्थानिक भाविक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा येथील भाविकही सहभागी झाले होते.

समुद्र किनाऱ्यावर रंगली महाआरती
" मंगल मूर्ती ....मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणांनी आचरे गाव दुमदुमून गेला होता.
विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीसा कडून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.मिरवणूकीत हिंदू बांधवाबरोबर गावातील मुस्लिम, ख्रिश्चन, बांधवही सहभागी झाले होते. मिरवणूक पिरावाडी समुद्र किनारी दाखल झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली.मावळत्या सूर्याच्या साक्षीने 'श्री ' गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्र किनारी भाविकांची एकच गर्दी झाली होती. यामुळे सागराबरोबर "जनसागरही" उसळल्याचे दृश्य दिसत होते.
फोटो : पंकज आचरेकर
▪️अमित खोत | मालवण

