Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

महाराष्ट्र चेंबर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

महाराष्ट्र चेंबर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

शंभर वर्षपूर्ती सोहळा बाबत चर्चा ; दुकानांना २४ तास परवानगी दिले बाबत मानले आभार

मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये आमदार राहुल दादा आवाडे, चेंबरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. उमेश दाशरथी, उपाध्यक्ष श्री. करुणाकर शेट्टी, श्री. संजय सोनवणे, श्री. शंकर शिंदे, कोकण उपाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण परब तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. ओमप्रकाश अग्रवाल आणि श्री. वेदांशू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी चेंबरच्या शंभर वर्ष पूर्तीच्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा झाली. सन २०२७ मध्ये शतकपूर्ती वर्ष साजरे होत असल्याने हा ऐतिहासिक सोहळा महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी संयुक्तरीत्या आयोजित करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

शिष्टमंडळाने नमूद केले की शतकपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यात प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट समित्या, कृषीविकास, उद्योगवृद्धी आणि व्यापारवाढीसाठी उपलब्ध असलेल्या योजना यांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्यातील विविध विभागांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील.

तसेच, राज्य शासनाने व्यापाऱ्यांना व दुकानदारांना २४ तास दुकाने सुरु ठेवण्याची दिलेली परवानगी हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय असल्याचे शिष्टमंडळाने नमूद करून शासनाचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची दखल घेत नवनियुक्त अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

rapan bottom