Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वीच दिव्यांग निधी वाटप करा

दिव्यांग बांधवांना दिवाळीपूर्वीच दिव्यांग निधी वाटप करा

माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी वेधले मालवण नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष

मालवण : मालवण शहरातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या धोरणानुसार मिळणारा पाच टक्के दिव्यांग निधी दिवाळी सणापूर्वीच वितरित करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण दाखवून निधी वाटप लांबणीवर टाकू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मालवण पालिका हद्दीत सुमारे १२० दिव्यांग बांधव आहेत. त्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार दरवर्षी सुमारे ९ लाख रुपयांचा दिव्यांग निधी मिळणे अपेक्षित असते. हा निधी शक्यतोवर गणेश चतुर्थी आणि दिवाळी या सणांच्या काळात वितरित करण्याची परंपरा आहे. परंतु, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे तो निधी निवडणुकांचा कार्यक्रम संपल्यानंतर जानेवारी महिन्यात मिळाला. सद्यस्थितीत नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहितेमुळे निधीचे वाटप लांबणीवर पडू नये अशी भुमिका श्री. कांदळगावकर यांनी मांडली आहे.

कांदळगावकर यांच्या मागणीनंतर नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दिव्यांग निधी वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. दिव्यांग बांधवांना दिवाळीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात हा निधी मिळाल्यास मोठी मदत होणार आहे.दरम्यान, ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आल्याचे श्री. कांदळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

rapan bottom