सातेरी मंदिर मार्गांवरील धोकादायक जीर्ण वीज खांब वीज वितरणच्या माध्यमातून बदलला
मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा आडवण सातेरी मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारा एक वीज खांब जीर्ण झाला होता. धोकादायक खांब कोसळून वीज पुरवठा खंडित होण्याची भीती होती. याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी वीज वितरणकडे पाठपुरावा करून नवीन वीज खांब बसवण्याची कार्यवाही पुर्ण केली.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले. तसेच वरील कामात वीज वितरण अधिकारी मयेकर, कॉन्ट्रॅक्टर गोवेकर यांचे सहकार्य लाभले असेही पाटकर यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक अरविंद, शाखाप्रमुख प्रमोद मराळ, जितु मराळ, अशोक मराळ, विश्वास परब, बाळा आचरेकर, अर्जुन चव्हाण, दिपक मराळ, उदय वीर, मयू मराळ, दिलीप मराळ, सौ. जागृती मराळ, सौ. मनाली मराळ, सौ. शुभांगी मराळ यांसह नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी दिपक पाटकर यांचे आभार मानले.

