Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

भैरवी मंदिरातील भजन महोत्सवाचा समारोप

भैरवी मंदिरातील भजन महोत्सवाचा समारोप

भजन महोत्सवातून सकारात्मक उर्जा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वक तथा माजी नगराध्यक्ष उद्योजक महेश कांदळगावकर यांचे प्रतिपादन

मालवण : देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत.शिस्तबद्ध नियोजन आणि आदर्शवत अशा प्रकारे परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो.आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. भजनातून होत असलेले संस्कार आणि दिशादर्शक प्रबोधनातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा सर्वांसाठीच महत्वाची असते,असे प्रतिपादन उद्योजक महेश कांदळगावकर यांनी केले.

मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचा समारोप उद्योजक महेश कांदळगावकर यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविकात अँड.पलाश चव्हाण यांनी भैरवी मंदिरच्या उभारणीचा व भजन महोत्सव आयोजनाचा आढावा घेतला. स्वागत भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाणयांनी केले. प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,माजी तालुकाध्यक्षआनंद आचरेकर,उद्योजक प्रदिप मुंबरकर, दिपा शिंदे,माजी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.

सकारात्मक उर्जा देणारा उपक्रम

भैरवी मंदीर मंडळाला रेकॉर्ड डान्स,सिनेमा दाखविणे कधीही शक्य असते. मात्र हे मंडळ भजन महोत्सव आयोजित करत नामस्मरण आणि देवाप्रती आराधना करत आहेत. यातूनच त्यांच्या विचारांचा आणि बौद्धीक क्षमतेची ताकद दिसून येते.मंडळे अनेक असतात मात्र कार्यक्रम झाल्यानंतर मंडळांबद्दल काही चर्चा बाहेर एकायला मिळत असतात. मात्र भैरवी मंदिरातील मंडळाबद्दल कधीच बाहेर कसलीही चर्चा होत नाही. उलट याठिकाणी भजनसेवेतून सकारात्मक उर्जा निर्माण होत असून यामुळे या परिसरातील प्रत्येक कुटुंब हे आनंदी आणि समाधानीच असे आहे. याठिकाणी आपण सातत्याने येत असून एक सकारात्मक उर्जा येथील आपल्याला आनंद देत असते. यामुळे मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.या मंडळाने अशाचप्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन आपल्या भजनसेवेचे कार्य सतत चालू ठेवावे, असेही श्री.कांदळगावकर म्हणाले.

मान्यवरांकडून मंडळाचे कौतुक
सत्काराला उत्तर देताना बुवा सुनील परूळेकर म्हणाले,मंडळ नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी आयोजित करून नामांकीत भजनी बुवांना मंदिरात आणून त्यांच्याकडून देवीची भजनरूपी सेवा करून घेते. त्याचा फायदा सर्व समाजाला होत असल्याने मंडळाचे कार्य गौरवास्पद आहे. मंडळाचे कार्यकर्ते दिशादर्शकपणे कार्यरत असून आपण त्यांच्या पाठिशी सदैव राहणार आहोत. संगीत आणि नामस्मरण हे माणसाच्या जीवनातील महत्वाचे भाग आहेत.भैरवी मित्रमंडळ संगीत आणि नामस्मरणात दोन्ही ठिकाणी आपल्या दर्जेदार उपक्रमातून पुढाकार घेत आहे. परमेश्वराला हाक घालण्यासाठी नामस्मरण महत्वाचे आहे, ते याठिकाणी सातत्याने होताना दिसत आहे. तुम्ही नामस्मरणातून देवाला साद दिली की तो त्याच प्रेमाने तुमच्यासोबत येत असतो, यामुळे या मंडळाचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे,असेही त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन अँड. पलाश चव्हाण यांनी केले.महोत्सव यशस्वीतेसाठी राजन सकपाळ,बबन सकपाळ,उदय चव्हाण,मिहीर चव्हाण, राहुल चव्हाण,रोहन चव्हाण,कांता चव्हाण, उत्तम चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, चिन्मय चव्हाण, किशोर चव्हाण, बाली चव्हाण,लवू चव्हाण, दिलीप वायंगणकर, उद्देश चव्हाण, जगदीश वालावलकर, संजय चव्हाण, कौशल वस्त, जयेश कुबल,आप्पा चिपकर तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

भैरवी मंदिरातील भजन महोत्सवात सलगपणे दहा वर्षे भजनसेवा करणारे प्रसिद्ध बुवा सुनील परूळेकर यांचा मंडळाच्यावतीने खास सत्कार करण्यात आला. तसेच मंदिराच्या सेवाभावी उपक्रमांत नेहमीच स्वच्छतेची जबाबदारी संभाळणारे आप्पा चिपकर यांचाही भेटवस्तु, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. भजन महोत्सवाचे थेट प्रक्षेपण केल्याबद्दल मालवण केबल नेटवर्कचे मुकेश बावकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. वडिलांच्या पश्चात साऊंड सर्व्हीस व्यवसायात आपली ओळख बनविणारे भावेश लाड यांचाही याप्रसंगी खास सत्कार मंडळाच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.

rapan bottom