मंत्रालय मुंबई येथे आरक्षण सोडत
मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत सोमवार 6 ऑक्टोबर रोजी परिषद सभागृह, सहावा मजला मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांच्या वतीने याबाबतचे पत्र राजकीय पक्षांना पाठवण्यात आले आहे. आता 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडत कडे राजकीय पक्ष तसेच स्थानिक स्तरावर इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

