Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्लास्टिक वर नियंत्रण आणा ; वन्यजीवांचे रक्षण करा

प्लास्टिक वर नियंत्रण आणा ; वन्यजीवांचे रक्षण करा

उपवनसंरक्षक शर्मा, धामापूर येथे वन्यजीव सप्ताहा निमित्त स्वच्छता आणि वृक्ष लागवड मोहीम संपन्न…

मालवण: वन्यजीव सप्ताह च्या निमित्त वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र धामापुर मधील धामापुर तलाव येथे गुरुवारी स्वछता मोहिम व वृक्ष लागवड करण्यात आली. उपवनसंरक्षक सावंतवाडी आयएफएस मिलिश शर्मा यांनी उपस्थितांस वन्यजीव व त्यांचे आश्रयस्थानांचे जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन केले. वनक्षेत्रात प्लास्टिक आदी कचरा टाकू नये. वन्यजीव पर्यावरणीय अन्नसाखळीचे महत्वाचे घटक असून त्यांचे संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी सहा. वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड, सहा. वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि.सचिन शिरतुडे, कुडाळ रेंज चे सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक, ग्रामपंचायत धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, सम्यंतक संस्थेचे सभासद प्रथमेश काळसेकर, कौशलं जोशी, रोहित आजगावकर, मोहम्मद शेख यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहभागातुन धामापूर तलाव लगत वनक्षेत्रातील प्लास्टिक आदी पर्यावरणास व वन्यजीवांस घातक कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे उपवनसंरक्षक सावंतवाडी, आयएफएस मिलिश शर्मा व सरपंच धामापूर यांचे हस्ते वनक्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली.

वन्यजीव सप्ताह च्या निमित्त वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र धामापुर मधील धामापुर तलाव येथे गुरुवारी स्वछता मोहिम व वृक्ष लागवड करण्यात आली. उपवनसंरक्षक सावंतवाडी आयएफएस मिलिश शर्मा यांसह सरपंच मानसी परब व अन्य अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. अशाप्रकारे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

rapan bottom