राज्य निवडणुक आयोगाकडून आरक्षण सोडत तारीख जाहीर
सिंधुदुर्ग : जिल्हापरिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाकडू जाहीर करण्यात आला आहे. ३२ जिल्हापरिषद आणि ३३६ पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


१३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हापरिषद विभागासाठी जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणासाठी तहसीलदार स्तरावर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

