स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत विविध उपक्रम
मालवण : 'स्वच्छता ही सेवा - २०२५' या अभियानांतर्गत कर्लाचाव्हाळ शाळा येथे स्वच्छता शपथ घेण्यात आली. याचबरोबर गावात शोषखड्डा खोदण्याच्या कामाला देखील उत्साहाने सुरुवात करण्यात आली.
स्वच्छतेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी सरपंच रश्मी रविंद्र टेंबुलकर यांच्यासह रविंद्र टेंबुलकर, ग्रामपंचायत अधिकारी एल. डी. सरमळकर, आरोग्य सहायिका एस. व्ही. सरमळकर, ग्रामपंचायत सदस्य श्रुती शैलेश सुकाळी, आशासेविका गौरी गुरुनाथ सुकाळी, ग्राममहसूल अधिकारी पी. जी. गुरव, ग्रामरोजगार सेवक अश्विनी सुकाळी, ग्रामपंचायत कर्मचारी विजय चव्हाण, कर्मचारी अवंतिका सांडव, केंद्रचालक प्रिशा बांदल, शैलेश सुकाळी, शामसुंदर जाधव, मिलींद सुकाळी, प्रमोद सामंत, दत्तात्रय सामंत, निकिता सांडव आणि मनिषा सडवेलकर यांसह अनेक ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि सर्वांनी एकत्रित येऊन गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेतली. शोषखड्डा खोदण्याच्या कामामुळे गावातील सांडपाण्याच्या योग्य विल्हेवाटीला मदत होणार आहे. यामुळे आरोग्य आणि परिसर स्वच्छता राखण्यास बळ मिळेल असे स्पष्ट करण्यात आले.

